लोकसभा सोलापूर व माढा मतदार संघासाठी राम सातपुते, रणजितसिंह निंबाळकर, धैर्यशील मोहिते, विजयसिंह मोहिते सह अनेक अर्ज दाखल

42-सोलापूर (अ. जा.) लोकसभा मतदारसंघासाठी श्री. राम सातपुते यांनी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे आज उमेदवारी अर्ज दाखल केला.
जोशबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
–श्रीकांत कसबे
42-सोलापूर (अ. जा.) लोकसभा मतदारसंघासाठी सौ. संस्कृती राम सातपुते यांनी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे आज उमेदवारी अर्ज दाखल केला.
43-माढा लोकसभा मतदारसंघासाठी श्री रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी अप्पर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह ठाकुर यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.
43-माढा लोकसभा मतदारसंघासाठी श्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह ठाकुर यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.
43-माढा लोकसभा मतदारसंघासाठी श्री धैर्यशील मोहिते पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह ठाकुर यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला
42-सोलापूर (अ. जा.) लोकसभा मतदारसंघासाठी श्रीदेवी जॉन फुलारे यांनी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे आज उमेदवारी अर्ज दाखल केला.
42-सोलापूर (अ. जा.) लोकसभा मतदारसंघासाठी विजयकुमार भगवान उघडे यांनी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे आज उमेदवारी अर्ज दाखल केला
42-सोलापूर (अ. जा.) लोकसभा मतदारसंघासाठी श्री. परमेश्वर पांडुरंग गेजगे यांनी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे आज उमेदवारी अर्ज दाखल केला.
43-माढा लोकसभा मतदारसंघासाठी श्री संतोष बाळासाहेब जोगले आरपीआयए यांनी निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह ठाकुर यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.
सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी आज रोजी पर्यंत एकूण 22 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत:-
43 माढा लोकसभा मतदारसंघातून आज लोकसभेसाठी 7 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत.
1. रणजितसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर, भारतीय जनता पार्टी.
2. खरात संदीप जनार्दन, अपक्ष
3. मोहिते पाटील विजयसिंह शंकरराव, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार
4. मोहिते पाटील धैर्यशील राजसिंह, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार
5. संतोष बाळासाहेब बिचुकले, आर पी आय ए
6. भाऊसाहेब सुखदेव लिगाडे, अपक्ष
7. गणेश अशोक चौगुले, अपक्ष.
42 लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी 10 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले…
1. राम विठ्ठल सातपुते भारतीय जनता पार्टी,
2. संस्कृती राम सातपुते भारतीय जनता पार्टी
3. परमेश्वर पांडुरंग गेजगे अपक्ष
4. सौ. फुलारे श्रीदेवी जॉन अपक्ष
5. श्री विजयकुमार भगवान उघडे अपक्ष
6. दगडू पंढरीनाथ घोडके अपक्ष
7. श्री विद्या दुर्गादेवी मौलप्पा कुरणे अपक्ष
8. बनसोडे राहुल दत्तू अपक्ष
9. अण्णा सुखदेव मस्के अपक्ष
10. रविकांत रेवप्पा बनसोडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया A.
दिनांक 12 एप्रिल रोजी 42 सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी एका उमेदवारांनी तर 15 एप्रिल रोजी 42 सोलापूर लोकसभा मतदारसंघात शिवाजी चंद्रकांत सोनवणे अपक्ष व राहुल काशिनाथ गायकवाड वंचित बहुजन आघाडी या दोन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे. तर 43 माढा लोकसभा मतदारसंघात दोन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत रामचंद्र मायप्पा घुटूकडे व रमेश बारस्कर वंचित बहुजन आघाडी सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी आज रोजी पर्यंत एकूण 22 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत.