Uncategorized

अन्यायाच्या ठिकाणात आता बदल झालाय म्हणूनच आम्ही संघर्षाची पध्दत पण बदलीय- प्रा.सुभाष वायदंडे 

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

कराड:- मागासवर्गीय समाजाच्या एक गठ्ठा मताचे गाजर दाखवून राज्यकर्त्यांच्या कडून स्वतःचा स्वार्थ साधून घेतलेल्या मागासवर्गीय समाजातील नेत्यांच्यामुळे या समाजावर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि आरक्षणाचा गुपित मार्गानं अन्याय सुरू असून हा समाज पन्नास वर्ष विकासापासून पाठीमागे गेला असून यापूर्वी गावच्या चावडीत, पारावर, ऊसात शेताच्या बांधावर आणि वाड्यात होणाऱ्या अन्यायाची जागा आता राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व आरक्षण या ठिकाणी बदलली असून अन्यायाच्या पद्धतीत जर तुम्ही बदल केला असेल तर संघर्षाची पद्धत सुद्धा आम्ही बदललेली आहे हे लक्षात ठेवा आणि मगच अन्याय करायचा की नाही याचा विचार करा असा इशारा पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांनी दिला. ते कराड या ठिकाणी संघटनेच्या “संघर्ष मेळाव्यात”अध्यक्षीय भाषण करताना बोलत होते.


कराड येथे पुरोगामी संघर्ष परिषदेचा राज्यस्तरीय संघर्ष मेळावा संपन्न झाला.
स्वागत व प्रास्ताविक पुरोगामी संघर्ष परिषदेचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष संजय साठे यांनी केले.
यावेळी पुरोगामी संघर्ष परिषदेचे राज्य सल्लागार कमिटीचे अध्यक्ष
प्राचार्य बाळासाहेब साठे यांना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा सुभाष वायदंडे यांनी संघटनेच्या महाराष्ट्र राज्याच्या प्रदेशअध्यक्ष पदाच्या निवडीची घोषणा केली व त्यांच्या सहीचे निवडीचे पत्र महासचिव मारुतीराव बोभाटे यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी प्राचार्य बाळासाहेब साठे, मारुतीराव बोभाटे, अनिल रणदिवे, छाया मोरे, सुभाषराव साळुंखे, नयना लोंढे यांची भाषणे झाली.


सदर मेळाव्यास कर्नाटक राज्याच्या प्रदेशाध्यक्षा सविता बनसोडे ,लखन वायदंडे, स्वप्निल बनसोडे, सर्जेराव भंडारे, दीपक शिंगे, विजयभाऊ सावंत, रणजीत माने, युवराज सोनावले, अंकुश भोंडे, अनिल पानपाटील, धर्मा भिल, जितेंद्र साळुंखे,सुखदेव सामुद्रे, दादासाहेब कांबळे , संजय भदाणे ,नारायण दादा पानपाटील,नयना लोंढे संगीता भोंडे, अतुल वाघमारे, खंडू कांबळे, युवराज वाघमारे, सुकेशिनी साठे, सीमा साठे , शंकरराव चव्हाण,रंजना जाधव, अधिक चव्हाण, आकाश नेटके, भास्कर खिलारे, अक्षय खुडे, नेताजी अवघडे, आण्णा फळके, अमोल लांडगे, तानाजी खिलारे, ज्योती अवघडे, सविता पानपाटील, वनिता जाधव, आरती लोंढे, दीपक साठे, शशिकांत गायकवा,आबा साठे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य दिपक तडाके यानी केले.तर आभार सौ.सुकेशिनी साठे यानी मानले

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close