३१ मार्च अखेर अनुकंपाची भरती न झाल्यास ४ एप्रिल पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनुकंपा धारक कुटुंबीयसह उपोषणास बसणार –अँड.सुनिल वाळूजकर
सोलापूर जिल्हा नगरपरिषद,नगरपंचायत कर्मचारी समन्वय समिती वतीने जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना यांना निवेदन

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :-सोलापूर जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या बाबत राज्याचे सरचिटणीस अँड .सुनील वाळूजकर, जिल्हाध्यक्ष काँ. सिद्धाप्पा कलशेट्टी, जिल्हा सदस्य धनराज कांबळे, भिंमा किरगल, परशेट्टी यांच्या शिष्ट मंडळाने जिल्हा प्रशासन अधिकारी वीणा पवार यांना निवेदन देवून चर्चा केली.
यावेळी झालेल्या चर्चेमध्ये सोलापूर जिल्ह्यातील नवीन झालेल्या नगरपंचायत मधील उद्घोघोषणे पूर्वीचे व उद्धघोषने नंतरचे सर्व कर्मचाऱ्यांचे विना शर्त विना अट समावेशन करावे, जिल्ह्यातील अनेक सफाई कर्मचारी व इतर सर्व कर्मचारी सेवानिवृत्त होऊन दोन दोन वर्षे झाले तरीसुद्धा व मयत झालेल्या सफाई व इतर कर्मचाऱ्यांच्या वारसांना अद्याप पर्यंत त्यांना रजावेतन किंवा उपदानाच्या रक्कम देण्यात आलेले नाहीत त्या त्वरित देण्यात याव्यात, जिल्ह्यातील अनेक कर्मचारी सेवेत असताना सन 2005 मध्ये मयत होऊन २० वर्षे होऊन गेले परंतु अध्याप पर्यंत त्यांच्या वारसांना अनुकंपा योजनेखाली सेवेत नियुक्ती देण्यात आलेली नाही अनेक अनुकंपाधारक हे शासनाच्या निर्देशानुसार वय वर्ष ४५ च्या पुढे गेल्यास त्यांना नियुक्ती मिळणार नाही आणि म्हणून अशा प्रलंबित असलेल्या ३० अनुकंपाधारकांना त्वरित अनुकंपाखाली नियुक्ती मिळावी, नगरपरिषदेमधील सर्व सफाई कर्मचारीची व इतर रिक्त पदे त्वरित भरावीत ,जिल्ह्यातील सर्व सफाई कर्मचाऱ्यांना श्रम साफल योजनेअंतर्गत मोफत घरे द्यावीत, सफाई कर्मचारी व इतर कर्मचारी यांना १२ व २४ वर्षाची कालबद्ध पदोन्नती मिळावी या मागण्याबाबत जिल्हा प्रशासनाधिकारी वीणा पवार यांच्या समवेत चर्चा करण्यात आली यावेळी आपले सर्व प्रश्न मार्गी लावण्यात येतील असे सकारात्मक आश्वासन यावेळी वीणा पवार मॅडम यांनी शिष्ट मंडळाला दिले तसेच याच प्रश्नावर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याशीही चर्चा करणे कामी वेळ मिळावी म्हणून मागणी करण्यात आली आहे. कारण जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब हे सफाई कर्मचारी व नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत अतिशय सकारात्मक विचार करणारे जिल्हाधिकारी असल्याने त्याच्याशी चर्चा होऊन जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागतील असे राज्याचे जनरल सेक्रेटरी अँड .सुनील वाळूजकर यांनी सांगितले यावेळी सर्व अनुकंपा धारक उपस्थित होते.