पालवी ” मध्ये आण्णाभाऊ साठे यांची जयंती सामाजिक उपक्रमांनी साजरी

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :-अनाथ आणि विशेष बालकांचे संगोपन करणारी पालवी संस्था पंढरपूर येथे सुनिल अडगळे सर यांच्या संकल्पनेतून लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंतीच्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. दलितमित्र नानासाहेब वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमास अध्यक्षिय मनोगत व्यक्त करताना त्यांनी जयंतीच्या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन गरजवंतांना मदत करण्याच्या निमित्ताने विविध समाजोपयोगी उपक्रम आयोजित केल्याबद्दल आणि प्रत्येक वर्षी असे कार्यक्रम करत असल्याबद्दल सुनिल अडगळे सरांच्या कार्याचे कौतुक करताना ‘ग्रामीण भागातून अशा प्रकारचे कर्तुत्वान कार्यकर्ते,विचारवंत निर्माण होत आहेत ही शिवराय फुले शाहू आंबेडकरी चळवळीसाठी अभिमानास्पद बाब असून यापुढेही त्यांनी असेच कार्य करावे, अण्णाभाऊ साठे यांचा आदर्श विधायक कार्यातून समाजासमोर आणावा, समाजाला दिशा द्यावी असा विचार व्यक्त केला.
.प्रा.डॉ.धनंजय साठे यांनी या गरजवंतांना मदत करण्याच्या या उपक्रमास शुभेच्छा देताना ‘सुनिल अडगळे सर यांच्या कार्यासोबत आपण सर्वांनी तन-मन धनाने सहभागी झाले पाहिजे.’असे मत व्यक्त केले. यावेळी ॲड.किशोर खिलारे, नागनाथ अडगळे आदींनीही आपली मनोगते व्यक्त करताना अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला उजाळा दिला.यावेळी मंचावर जोशाबा टाईम्सचे संपादक श्रीकांत कसबे, डॉ. शिवाजी पाटोळे,प्रा.भाऊसाहेब कांबळे,पालवी संस्थेचे समन्वयक वैभव मोरे, दत्तात्रय पाटोळे सर ,आकाश वाघमारे,प्रकाश साठे,पिंटू अडगळे,दादा वाघमारे, मल्हारी फाळके,आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पालवी संस्थेस बालकांची तहान भागवण्यासाठी दीड हजार लिटरची पाण्याची टाकी भेट देण्यात आली,शैक्षणिक साहित्याचे वाटप,खाऊ वाटप,चळवळीतील मान्यवरांचा व कार्यकर्त्यांचा सत्कार आणि संस्थेतील इ.१०वी,१२वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान असा विविधांगी व समाजोपयोगी कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक सुनिल अडगळे यांनी केले,आभार समाधान वायदंडे यांनी मानले तर सूत्रसंचालन दत्तात्रय कांबळे यांनी केले.