संजय घोडके यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड
राष्ट्रवादी काँग्रेस उत्तर सोलापूरचे निरीक्षक पदासाठीही नियुक्ती

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :-सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्टीच्या उपाध्यक्षपदी संजय घोडके याची निवड करण्यात आली असल्याचे अधिकृत पत्र जिल्हाध्यक्ष दिपकआबा साळुंखे पाटील यांनी दिले आहे.
संजय घोडके यांना वयाच्या लहानपणी पासून समाजसेवा करण्याची सवय आहे. काँग्रेस आय पक्षातही त्यांनी जिल्हा पातळीवरील पदावर काम केले होते.
मागील पाच वर्षापूर्वी ना. दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत घोडके राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या गटबाजीमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जिल्हाध्यक्ष दिपकआबा साळुंखे पाटील यांनी जिल्हा पातळीवर निवड केली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस उत्तर सोलापूरचे निरीक्षक पदासाठी ही नियुक्ती त्यांची निवड केली आहें.
निवडीचे पत्र सोलापूर येथे नुकतेच देण्यात आले. यावेळी प्रांतिक सदस्य कल्याणराव काळे, उत्तमराव जानकर यांचेसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.