डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ 29वा नामविस्तार दिन साजरा….
भिमशक्ती सांस्कृतिक बहुउद्देशीय सामाजिक संस्था व रमामाता महिला मंडळाचे वतीने भीम सैनिकांचा सत्कार

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर :- १४ जानेवारी २०२४ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनास २९ वर्षे पूर्ण झाले.
नामविस्तार लढा हा १९७६ ते १९९४ पर्यंत चालू राहिला या कालावधीत अनेक भीम सैनिक शहीद झाले.
या दरम्यान पंढरपूर शहरातील अनेकांनी या लढ्यात सहभाग घेतला होता त्यापैकी भारतीय दलीत पॅंथरचे तीन भीम सैनिक मोहन ढवळे,राजाभाऊ दंदाडे,संजय माने यांनी भारतीय दलीत पॅंथर मार्फत सक्रीय सहभाग घेतला होता.
राजाभाऊ दंदाडे
मोहन दिगंबर ढवळे
संजय दत्तात्रय माने
त्या भीम सैनिकांचा भिमशक्ती सांस्कृतिक बहुउद्देशीय सामाजिक संस्था व रमामाता महिला मंडळ संस्थापक अध्यक्ष संतोष सर्वगोड यांच्या वतीने सत्कार करण्यात आला व शहीद झालेल्या भीम सैनिकांना आदरांजली वाहण्यात आली. तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
त्यावेळी अनिल(मामा)वाघमारे, राहुल (दादा) मोरे, अरुण सर्वगोड, धर्मपाल (मामा) जाधव, ज्ञानेश्वर ढवळे, विनायक चंदनशिवे, दत्ता चंदनशिवे, शिवाजी चंदनशिवे, गणेश शिंदे, लखन शिंदे, गुरू दोडीया, मुज्जीब जमादार, आप्पा ननवरे, किशोर खडाखडे, संकेत खटावकर, रविंद्र सर्वगोड, सुनील माने, सिध्दार्थ सरवदे, लखन लामकाने, रशीद मुलाणी, रज्जाक तांबोळी, इसाक सय्यद, ऋषिकेश भोरकडे, बापू भोसले,
सचिन भोरकडे, श्रीकांत चंदनशिवे (सर), कुणाल वाघमारे, दिपक बनसोडे, रोहित चंदनशिवे, कृष्णा मोरे, सुहास कदम, अविनाश कांबळे, बाबासाहेब चंदनशिवे, ताजुद्दिन सय्यद, मौला मुलाणी, लखन सर्वगोड, अजय चंदनशिवे, जितकुमार गावकरे, योगेश सर्वगोड, किर्तीकुमार भोरकडे, युवराज कांबळे, ओंकार सर्वगोड, प्रभाकर आठवले, कैलास शिंदे, करण लकेरी, सिध्दार्थ गावकरे,मंडळातील पदाधिकारी उपस्थित होते.