प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौऱ्या दिवशी जिल्ह्यातील महादेव कोळी समाज अन्नपाणी त्याग करणार .– गणेश अंकुशराव.

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर दि.14 [ प्रतिनिधी ] देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 17 जानेवारी रोजी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्या दिवशी जिल्ह्यातील आदिवासी महादेव कोळी जमातीचे समाज बांधव अन्नत्याग करणार आहेत असे महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी सांगितले आहे.
आदिवासी क्षेत्राच्या बाहेर राहणाऱ्या45 ते 50 लाख महादेव कोळी जमातीचा जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्राचा प्रश्न गेली अनेक वर्ष रेंगाळला असून लोकशाही मार्गाने अनेक वेळा उपोषण मोर्चे आंदोलन करून सुद्धा राज्य शासनाने न्याय दिला नाही.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जानेवारीला सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून जेवढा वेळ नरेंद्र मोदी सोलापूर जिल्ह्यामध्ये थांबतील तेवढा वेळ महादेव कोळी जमातीचे लोक अन्नपाणी ग्रहण करणार नाहीत. असा निर्धार समाजाच्या झालेल्या बैठकीत केला आहे .असे महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी सांगितले आहे.
1956 ला कारण नसताना षडयंत्ररचून कोळी जमातीला क्षेत्र बंधन लागू केले होते. ते क्षेत्रबंधन भारतीय संसदेने 1976 ला उठवले.आहे. त्यामुळे आदिवासी क्षेत्राच्या बाहेरील आदिवासी महादेव कोळी समाज सवलतीस पात्र झाला आहे. परंतु आज पर्यंत ह्या राज्य शासनाने व आदिवासी जमातीच्या 25 आमदार आणि चार खासदारांनी आदिवासी क्षेत्राच्या बाहेरील कोळी जमातीला जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र मिळू दिले नाही. त्यामुळे हा समाज खूप मागे राहिला असून लोकशाही मार्गाने आंदोलन करूनही न्याय मिळत नसल्याने या प्रश्नात देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांनी लक्ष घालावे यासाठी सोलापूर जिल्ह्यात नरेंद्र मोदींचा दौरा होणार असून ज्या दिवशी ते सोलापूर जिल्ह्यात येतील तेव्हापासून ते जाईपर्यंत कोळी जमातीचे समाज बांधव अन्नपाणी ग्रहण करणार नाहीत असा निर्धार करण्यात आला आहे .त्यामुळे नरेंद्रभाई मोदी यांनी संसदेने 1976 ला क्षेत्र बंधन उठवले आहे त्याची अंमलबजावणी राज्य शासनाने आजपर्यंत केलेली नाही त्यामुळे संसदेने केलेल्या कायद्याचे अपमान करणाऱ्या राज्य शासनावरती कठोर कारवाई करावी आदिवासीच्या लोकसंख्येवर निवडून जाणारे आदिवासी 25 आमदार व चार खासदार आदिवासी कोळी जमातीलाच सवलती पासून वंचित ठेवतात त्यामुळे यांना अपात्र करावे व कोळी जमातीच्या जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्राच्या प्रश्नाकडे लक्ष घालून महादेव कोळी जमातीला जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने देण्याचे आदेश द्यावेत व चंद्रभागेतील पात्रात जिथे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेना अटक केली होती त्या जागेवर राष्ट्रीय स्मारक व्हावे मंजूर होऊनही कामाला सुरुवात होत नाही ते काम त्वरित व्हावेअशी मागणी समाज बांधवांच्या वतीने आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे चौक पंढरपूर येथे घोषणाबाजी करून महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी मागणी केली आहे. यावेळी दादासाहेब करकमकर अशोक अधटराव पांडुरंग सावतराव सुरज कांबळे गुरू अंभगराव लालू संगीतराव संपत सर्जे बाळासाहेब अधटराव प्रकाश मगर राम भाऊ सुरवसे माऊली कोळी प्रशांत कांबळे. रोहन कांबळे ललया परचंडे सागर परचंडे संदिप कोरे पांडुरंग कांबळे भैया नेहतराव सोमनाथ अंभगराव ओंकार अधटराव दादा माने उदय पंरचंडे तसेच असंख्य आदिवासी महादेव कोळी बांधव उपस्थित होते