2024 च्या निवडणुकीत रिपब्लिकन सेना ताकदीने उतरणार -आनंदराज आंबेडकर
रिपब्लिकन सेनेची मुंबईत आनंदराज आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक संपन्न

रिपब्लिकन सेना पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सागर गायकवाड निवड करुन नियुक्ती पत्र देण्यात आले.
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :-रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली दादर मुंबई येथील आंबेडकर भवन या ठिकाणी दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी रिपब्लिकन सेनेची महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीला महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांसह जिल्हाध्यक्ष, युवा जिल्हाध्यक्ष, यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीला राष्ट्रीय महासचिव संजीव बौधनकर, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काकासाहेब खंबाळकर, युवा प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे, प्रदेश महासचिव प्रा. युवराज धसवाडीकर ,प्रदेश संघटक भैय्यासाहेब भालेराव ,प्रदेश सचिव श्रीपती ढोले, प्रदेश उपाध्यक्ष खाजा मियां पटेल,प्रदेश उपाध्यक्ष भगवान शेंडे, प्रदेश उपाध्यक्ष संजय देखणे, कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष युवराज बनसोडे,प्रदेश सचिव माधवराव जमदाडे , मराठवाडा अध्यक्ष मिलिंद बनसोडे,मुंबई अध्यक्ष प्रकाश खंडागळे, मुंबई महिला अध्यक्ष सुनीताताई डोळस, विद्यार्थी सेनेचे मुंबई अध्यक्ष आशीष गाडे, शेतकरी आघाडी प्रदेशाध्यक्ष मुजीब पठाण, प्रदेश प्रवक्ते प्रा. विजयकुमार घोरपडे,आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सिद्धांत सुर्यवंशी,आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते तर सुत्रसंचलन प्रदेश प्रवक्ते वसंत कांबळे यांनी केले.
या बैठकीमध्ये सर्व जिल्हाध्यक्ष, युवा जिल्हाध्यक्ष ,तालुका अध्यक्ष, आपापल्या विभागाचा आढावा लिखित स्वरूपा सादर केला,
यावेळी बोलताना आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले की येणाऱ्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन सेना उतरणार असून ताकतीने कामाला लागण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच इव्हीएम हटाव देश बचाव चा नारा बुलंद करण्यासाठी महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
बैठकीत युवा प्रदेश अध्यक्ष किरण घोंगडे यांनी सांगितले की रिपब्लिकन सेना युवा आघाडीची महाराष्ट्र कार्यकारणी नव्याने बांधण्यात येणार असून नवीन चेहऱ्याला संधी देऊन कामाला लावण्यात येणार आहे तसेच सर्व विभागीय अध्यक्ष ,युवा जिल्हाध्यक्ष, युवा तालुका अध्यक्ष ,युवा शहराध्यक्ष, शाखा अध्यक्ष ह्या सर्व कमिट्या कायम असल्याची घोषणा करुन कामाला लागण्याचे आवाहन करण्यात आले.
तसेच लवकरच प्रदेश रिपब्लिकन युवा आघाडीच्या वतीने महाराष्ट्र दौऱ्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती देखील युवा प्रदेश किरण घोंगडे यांनी दिली.
महाराष्ट्र कार्यकारणी साठी इच्छुक असणाऱ्या व पुर्ण वेळ देणार्या कार्यकर्त्यांनी संपर्क साधावा असे आवाहन युवा प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांनी केले.
या बैठकीत मराठवाडा पुर्व अध्यक्ष पदी नितीन बनसोडे यांची निवड करण्यात आली तर नवी मुंबई युवा जिल्हाध्यक्ष अमोल पट्टेकर यांची रिपब्लिकन सेना पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सागर गायकवाड निवड करुन नियुक्ती पत्र देण्यात आले.