संविधानिक मूल्य जपणे प्रत्येकांचे कर्तव्य —प्रा. डॉ. किशोर खिलारे
फुले शाहू आंबेडकर विचारमंच आयोजित व्याख्यानात व्यक्त केले विचार

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर –समता, स्वातंत्र्य, न्याय बंधूता ही संविधानिक मूल्य जपणे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहें. इतिहासापासून बघितले तर वरील मूल्य ठोकरून विषमतावादी विचाराचे संचलन करणारी एक व्यवस्था कार्यरत असून आज ही वरील मूल्ये पायदळी तुडवून संविधानाबाबत सभ्रम निर्माण करणे सुरु आहें. त्याबाबत सजग राहून संविधात्मक जागृती केली पाहिजे असे विचार राज्यशास्त्राचे अभ्यासक प्रा. डॉ. किशोर खिलारे (कोल्हापूर )यांनी व्यक्त केले. ते फुले शाहू आंबेडकर विचारमंच चे वतीने आयोजित केलेल्या “भारतीय संविधान व आपण “या विषयावर आयोजित केलेल्या व्याख्यानात बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षास्थानी विचार मंचाचे अध्यक्ष सुनील वाघमारे हें होते. तर प्रमुख पाहुणे ऍड. अर्जुन पाटील,अध्यक्ष बार असोसिएशन पंढरपूर हें होते.
कार्यक्रमाचे सुरुवातीस डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पाहुण्याच्या हस्ते पुष्प हार अर्पण करण्यात आला. नंतर संविधानाच्या प्रास्तविकेतील उद्देशीकाचे समुदाईक वाचन करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वकिलीस 100वर्ष पूर्ण झाले बद्दल उपस्थित वकिलांचा सन्मान करण्यात आला.
पुढे बोलतांना डॉ. खिलारे म्हणाले की.. फुले शाहू आंबेडकरांना अपेक्षित असणाऱ्या मानवतावादी सामाजिक मुल्याचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला असून त्यानुसार देशाचा कारभार आज होतो की नाही याकडे लक्ष देऊन क्रियाशील कार्यरत राहणे ही आपली जबाबदारी आहें.
ऍड. अर्जुन पाटील यांनी संविधानाचे महत्व ओळखून येणाऱ्या काळात प्रबोधन होणे गरजेचे आहें हें स्पष्ट केले.
अध्यक्षीय भाषणात सुनील वाघमारे म्हणाले की, ज्या दिवशी संविधान लागू झाले त्याच दिवसापासून संविधानाशी धोकेबाजी सुरु असून संविधानाला बदनाम करण्याचे कट कारस्थान सुरु आहें…1997 साली सरकार कडून स्वातंत्र्याची सुवर्ण जयंती साजरी करण्यात आली. परंतु 2000 साली प्रजासत्ताक भारताची सुवर्ण जयंती साजरी केली नाही. त्यामुळे याबाबत सरकार दुहेरी भूमिका करत असून ही धोकेबाजी ओळखली पाहिजे. तुमच्या आमच्या जगण्याची सनद “भारतीय संविधान “आहे. ते टिकेल तरच आपण टिकणार आहोत. त्या साठी संविधान प्रति प्रामाणिक व गांभीर्याने आपली जबाबदारी पार पाडणे ही प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहें.
प्रास्ताविक राजेंद्र पाराध्ये सर यांनी केले तर सूत्रसंचालन ऍड. कीर्तिपाल सर्वगोड यांनी केले आभार सिकंदर ढवळे यांनी मानले. यावेळी विचारमंचाचे सर्व पदाधिकारी, सल्लगार समिती, वकील, प्राध्यापक व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
शेवटी राष्ट्रगीत होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.