पुरोगामी संघर्ष परिषदेच्यावतीने अण्णाभाऊना अभिवादन

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
सांगली:- पुरोगामी संघर्ष परिषद महिला पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या वतीने जगदविख्यात साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त पुरोगामी संघर्ष परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्ष सौ स्वाती सौंदडे यांच्या हस्ते प्रथमेश पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना सौ. स्वाती सौंदडे म्हणाल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यामध्ये वास्तववादी चित्रण हुबेहुब साकारलेले असल्याने स्त्रीवर होत असलेला अत्याचार अण्णा भाऊंनी साहित्याच्या रूपानं लेखणीच्या माध्यमातून मांडताना प्रस्थापित व्यवस्थेबद्दल लिहिताना जराही कसूर सोडली नाही म्हणूनच अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये विविधता दिसून येते.
यावेळी पुरोगामी संघर्ष परिषदेच्या सांगली शहर अध्यक्षा कलावती बेलगी, महादेवी खोत मनीषा कलगुटगी, पूजा सौंदडे, द्रौपदी सौंदडे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होत्या. शेवटी आभार विजय सौंदडे यांनी मानले.