विवेक वर्धिनीत साहित्यिक व माजी विद्यार्थी बाळासाहेब खिलारे यांचा सत्कार.

जोशाबा टाईम्स वेब न्यूज
श्रीकांत कसबे
पंढरपूर:- विवेक वर्धिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या प्रशालेतून आजवर विविध क्षेत्रातील उच्च पदावरअनेक माजी विद्यार्थ्यांनी स्थान मिळवले असून कला,क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, राजकीय,सामजिक, स्थापत्य ,अशा अनेक क्षेत्रांमध्ये विद्यार्थी चमकत आहेत.त्यापैकी साहित्य क्षेत्रामध्ये प्रशालेचे माजी विद्यार्थी बाळासाहेब खिलारे यांच्या कादंबरीला राष्ट्रीय संत नामदेव कादंबरी साहित्य पुरस्कार मिळाला आहे.सध्या खिलारे हे औंध पुणे येथे महावितरण मध्ये कार्यरत असून त्यांनी नुकतीच प्रशालेला भेट दिली. त्यावेळी प्रशालेचे प्राचार्य राजेंद्र पाराध्ये यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी खिलारे यांनी विवेक वर्धिनी हे ज्ञानाचे भांडार असून ज्ञानदाना बरोबरच,संस्कार, शिस्त यांचे धडे मिळतात या प्रशालेच्या व संस्थेच्या मार्गदर्शना मुळेच आपणास यश मिळाले आहे असे मनोगत व्यक्त केले.यावेळी मार्गदर्शक शिक्षक राजूभाई मुलाणी, शिवाजीराव येडवे,सुनिल विश्वासे,तसेच विजय कर्नेकर,अनिल सोनार,तानाजी चोपडे व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.