सोलापूर जिल्हा ८९९१५ कोरोना पाँझीटिव्ह रुग्णापैकी ७०१८० रुग्ण झाले बरे
१७८३० रुग्णावर उपचार सुरू

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्ट
श्रीकांत कसबे
पंढरपूर:- सोलापूर जिल्हाग्रामीण(महानगरपालिका क्षेत्र वगळून)दि.८ मे रोजी संध्याकाळी आरोग्य विभाग सोलापूर यांचे वतीने जाहीर करण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रकानुसार एकुण कोरोना पाँझीटिव्ह रुग्ण ८९,९१५(पुरुष-५५११२स्त्री-३४८०३)पैकी ७०१८०रुग्ण(पुरुष-४३४०६,स्त्री-२६७७४) आता पर्यंत बरे होऊन घरी गेले आहेत. तर यापैकी आतापर्यंत १९०५ (पुरुष-१३३३स्त्री-५७२) रुग्ण मयत झाले आहेत. सध्या यापैकी १७८० (पुरुष-१०३७३ स्त्री-७४५७) रुग्णावर विविध हाँस्पिटल मध्ये उपचार सुरु आहेत.
पंढरपूर ग्रामीण मध्ये१०५३३तर शहरामध्ये६७२३ एकुण -१७२५५ रुग्ण कोरोना पाँझीटिव्ह आढळून आले असुन यापैकी ३३०(शहर-१२८ग्रामीण-२०२) रुग्ण मयत झाले आहेत. आतापर्यंत १४१२३( शहर-५७४८ग्रामीण-८३७५)रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.तर २७८२-रुग्णावर (शहर-८४६ ग्रामीण-१९३६) उपचार सुरु आहेत.


