ज्ञानराज पब्लिक स्कुलला 2022 चा “आदर्श व उपक्रमशील शाळा पुरस्कार ” प्राप्त

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पुणे:-दौड तालुका माध्यमिक शिक्षक संघ व माध्यमिक शिक्षक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “2022 चा “आदर्श व उपक्रमशील शाळा पुरस्कार खामगांव येथील ” ज्ञानराज शिक्षण संस्थेच्या ज्ञानराज पब्लिक स्कुलला देण्यात आला. “पवार पॅलेस “सोन वाडी, तालुका दौंड येथे संपन्न झालेल्या भव्य सोहळ्यात माजी आमदार रमेश आप्पा थोरात साहेब यांच्या शुभहस्ते देण्यात आला.हा पुरस्कार संस्थेच्या वतीने मुख्याध्यापक राम सोनटक्के तसेच शिक्षिका जयश्री गुंड, सौ. सोनाली कोळपे,श्री सोमनाथ बिचुकले यांनी स्वीकारला.
या पुरस्काराचे मानकरी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र जगताप सर, निलेश नाईक सर ,अनिल शिंगाडे सर, राजेंद्र जगताप सर, नितीन कुदळे सर व संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य यांचे बहुमोल मार्गदर्शन, आपणा सारख्या जबाबदार पालकांचे सहकार्य, सर्व अनुभवी व मेहनती शिक्षक आणि शाळेचे गुणी हुशार विद्यार्थी आहेत. ह्या पुरस्कारामुळे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एक नवी ऊर्जा व नवचैतन्य प्राप्त झाले आहे.
आपणा सर्वांचे मी हार्दिक अभिनंदन करतो.आणि या पुढेही आपले बहुमोल मार्गदर्शन व सहकार्य असेच मिळेल अशी अपेक्षा राम सोनटक्के (मुख्याध्यापक, DPS, खामगाव) यांनी व्यक्त केली आहे.