पुरोगामी विचारांची मशाल कायम धगधगतीच ठेवणार -सुभाषराव साळुंखे
प.महाराष्ट्र संघटकपदी निवड झालेनंतर व्यक्त केल्या भावना

सुभाषराव साळुंखे पश्चिम महाराष्ट्र संघटक पुरोगामी संघर्ष परिषद
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
कराड:- (पाटीलवाडी) राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांचे नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्रामध्ये फुले, शाहू, आंबेडकर ,आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा विसर आता पडत चाललेला असतानाच प्रतिगामी विचारांचा वावर वाढला असून अशा परिस्थितीमध्ये पुरोगामी संघर्ष परिषदेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी म्हणून परिवर्तन करत असताना पुरोगामी विचारांना पर्याय नसून तळागाळातील लोकांच्या पर्यंत पोहोचत असताना पुरोगामी विचारांची मशाल की कायम धगधगती ठेवणार असल्याचे प्रतिपादन पुरोगामी संघर्ष परिषदेचे पश्चिम महाराष्ट्राचे नवनियुक्त संघटक सुभाषराव साळुंखे यांनी केले.
पश्चिम महाराष्ट्राचे संघटक म्हणून त्यांची नियुक्ती राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यानी वर्धापन दिनी सातारा केली होती.त्यानिमित्त ते आयोजित केलेल्या सत्काराला उत्तर देताना पाटीलवाडी (ता.कराड)येथे बोलत होते.
स्वागत व प्रास्ताविक सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष अधिकराव चव्हाण यांनी केले. यावेळी पुरोगामी संकष्ट परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे सल्लागार कमिटीचे अध्यक्ष प्राचार्य बाळासाहेब साठे यांच्या हस्ते सुभाषराव साळुंखे यांना शाल व फेटा बांधून नागरी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष संजयरावजी साठे ,पश्चिम महाराष्ट्राच्या उपाध्यक्षा सौ. सीमा साळुंखे, कराड तालुक्याच्या अध्यक्षा सौ. सुकेशनी साठे, कराड तालुक्याचे उपाध्यक्ष रमेश साठे, कराड तालुका* *सरचिटणीस आकाश नेटके, इत्यादी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शेवटी आभार कराड तालुक्याचे अध्यक्ष शंकर चव्हाण यांनी मानले.







