लायसन इंजिनियर्स असोसिएशन पंढरपूर वतीने अभियंता दिन साजरा

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर :-पंढरपूर नगरपरिषद पंढरपूर येथील सभागृहात लायसन इंजिनियर्स असोसिएशन पंढरपूर तर्फे अभियंता दिन साजरा करण्यात आला . भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष सारंग कोळी यांनी प्रतिमेस हार घालून पूजन केले. यानंतर लायसन इंजिनियर्स असोसिएशन पंढरपूर आणि एस आर जे स्टील इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमानाने इंजिनियर्स मीट घेण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंढरपुरातील श्री ओम स्टीलचे डीलर संतोष पवार व प्रमुख पाहुणे म्हणून एस आर जे पिटी स्टील इंडस्ट्रीजचे रिजनल मॅनेजर आनंद साळुंखे हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली यावेळी उपस्थित आनंद साळुंखे यांचे स्वागत बाळ कुंभार , पंढरपूर क्रिडाई चे अध्यक्ष अमित शिरगावकर यांचा सत्कार इमरान बेद्रेकर क्रीडाईचे सचिव देशपांडे साहेब यांचा सत्कार हनुमंत खिलारे श्री ओम स्टीलचे डीलर संतोष पवार यांचा सत्कार सचिन माळवदे यांनी केला.
कोणताही देश असो त्यांच्या प्रगतीत व विकासात शास्त्रज्ञाचा व इंजिनिअरचा मोठा वाटा असतो यांच्याशिवाय देशाची ओळखच निर्माण होऊ शकत नाही अशा घटनेचा यंत्रणेचा आपण घटक आहोत याबद्दल आपणा सर्वांना सार्थ अभिमान आहे शून्यातून जग निर्माण निर्माण करण्याची ताकद इंजिनियर्स मध्ये असते अगदी सुईपासून चंद्रयान च्या सर्व उपकरणे व पार्ट्स तयार करण्याचे काम देखील इंजिनियर्सनेही केलेले आहे आपल्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट अभियंत्याच्या ज्ञानाच्या मदतीनेच बनलेली आहे इंजिनिअरच्या योगदानाची व ज्ञानाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी इंजिनिअर डे साजरा केला जातो असे कार्यक्रमाचे प्रस्तावना करताना असोसिएशनचे अध्यक्ष सारंग कोळी यांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर एस आर जे स्टील कंपनीचे रिजनल मॅनेजर आनंद साळुंखे यांनी श्री ओम स्टील बार या संदर्भात प्रेझेंटेशन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री ओम स्टीलचे पंढरपूरचे डीलर संतोष पवार यांनी सर्व इंजिनियर्सला अभियंता दिनाच्या शुभेच्छा देऊन योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन असोसिएशनचे सह सचिव अमित लाडे यांनी केले व आभार प्रदर्शन असोसिएशनचे सचिव सोमनाथ काळे यांनी केले. यानंतर सामाजिक संस्था पालवी येथे मुलांना खाऊ वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेंद्र आटकळे संतोष कचरे जितू बत्रा भारत ढोबळे व सर्व इंजिनियर यांनी सहकार्य केले.