Uncategorized

सुनिल अडगळे यांना जिल्हा परिषदेचा “आदर्श शिक्षक पुरस्कार” प्रदान.

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

-श्रीकांत कसबे

पंढरपूर :-“जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा भोसे “या शाळेत कार्यरत  असलेले  शिक्षक यांना  सुनील अडगळे यांना जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला.2020- 21 सालचा शालेय गुणवत्तेसाठी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल आणि जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील वाड्या वस्तीवरील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
यावेळी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे,मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे मॅडम, शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी महारुद्र नाळे, सुलभा वठारे शिक्षणाधिकारी योजना, गटशिक्षणाधिकारी मारुती लिगाडे, विस्ताराधिकारी बिभीषण रणदिवे, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष अनिल कादे,सरचिटणीस अमोगसिद्ध कोळी, पंढरपूर तालुकाध्यक्ष सुनिल कोरे आणि सर्व पदाधिकारी, केंद्रप्रमुख धोंडीबा क्षीरसागर, मुख्याध्यापिका शशिकला परचंडे, अर्चना कोळी,सारिका फासे आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रानमळा भोसे या शाळेचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावताना व्यक्तिमत्व विकास आणि विविध स्पर्धा परीक्षांमध्ये असंख्य विद्यार्थी चमकले.
पांढरे वस्ती शाळा 365 दिवस चालवताना ‘जोपर्यंत स्कॉलरशिपच्या गुणवत्ता यादीत विद्यार्थी चमकत नाहीत, तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही अशी प्रतिज्ञा केलीआणि पाच विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत चमकावून प्रतिज्ञा पूर्ण केली’. जिल्हा परिषदेच्या भोसे शाळेमध्येही विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवताना विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये आले. यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी त्यांचा सदैव गौरव केला.सध्या जाधववाडी शाळेमध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रामध्येही विशेष योगदान दिलेले आहेत. आपल्या अमोघ वाणीने वक्तृत्वाच्या माध्यमातून समाजमन घडवण्याचे काम करण्याबरोबरच ते एक प्रतिभा संपन्न कवी आणि लेखक या नात्यानेही सामाजिक परिवर्तनाचे कार्य करीत आहेत. सामाजिक कार्य करताना गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, गरजवंतांना जीवनाश्यक वस्तूचे वाटप करण्याचेही ते कार्य सर्वांच्या मदतीने करत आहेत.जिद्दीने कार्य करण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या सर्वांमुळेच हा पुरस्कार मिळाला असल्याची भावना सुनिल अडगळे यांनी व्यक्त केली. हा दैदिप्यमान व अविस्मरणीय सन्मान सोहळ्याला शिक्षक समितीचे नेते सुरेश पवार जिल्हाध्यक्ष बसवराज गुरव, सरचिटणीस पोपट कापसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर मोरे, जिल्हा कोषाध्यक्ष रमेश खारे,जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सचिन लादे,संजीव चाफाकरंडे, जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षिका स्नेहल आमले, शरद गावडे, शिक्षक नेते सिद्धनाथ भंडारे, जिल्हा प्रसिध्दीप्रमुख अण्णासाहेब रायजादे,पुरोगामी प्राथमिक शिक्षक सह.पतसंस्थेचे चेअरमन विजय जाधव व्हा.चेअरमन रावण मदने, डॉ. प्रशांत ठाकरे, विकासराव बढे,ॲड.संतोष थोरात, मा.चेअरमन आवेश करकमकर,दत्तात्रय खंदारे,किशोर गोडसे,संतोष कापसे, हेमंत माने एकनाथ कुंभार, रमेश गावडे, ज्ञानेश्वर दुधाणे,ज्ञानेश्वर उगाडे ,अनिल खोटे, पुरुषोत्तम जाधव, अतुल भोपळे,शिक्षक समिती महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा सुरेखा इंगळे, तालुकाध्यक्षा देवकी दुधाणे,सरचिटणीस अर्चना कोळी, उपाध्यक्षा मंजिरी देशपांडे,सुप्रिया आमले,जिल्हा कार्यालयीन चिटणीस चंद्रकला खंदारे,संचालिका संगिता कापसे, कार्याध्यक्षा सुवर्णा टकले, योगिता अडगळे,सुनंदा गुळमे,मंगल जाधव,स्मिता रजपूत आदी शिक्षक पदाधिकारी, विठ्ठल कवडे, धनाजी देशमुख, आप्पासाहेब माळी, विशाल गायकवाड, रणजीत थिटे, दत्तात्रय गायकवाड, डॉ. राजेंद्र मगर, रोहिदास कांबळे आणि शिक्षक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close