पंढरपूरात दिवंगत आ. विनायक मेटेना सर्व पक्षीय श्रद्धांजली

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंंढरपूर:-शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आ विनायक राव मेटे ना सर्व पक्षीय सर्व संघटना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभा चे तनपुरे महाराज मठ पंढरपूर येथे सकल मराठा समाज व शिवसंग्राम जिल्हा अध्यक्ष सुधीर धुमाळ यांच्या वतीने आयोजन केले होते यावेळी आ विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे याना विधान परिषद वर घेण्यासाठी व मेंटच्या अपघाताची निपक्ष चौकशी करण्याचे सर्व पक्षीय ठराव करून मुखमंत्री याना मागणी करण्याचे ठरले यावेळी सर्व मान्यवरांनी मेटे यांच्या आठवणी सांगत सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी आमदार समाधान अवताडे, विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील , कल्याणराव काळे रोंगे पांडुरंग कारखान्याचे माजी उपाध्यक्ष वसंतराव देशमुख, मनसेचे नेते दिलीप धोत्रे विठ्ठल चे माझी व्हाईस चेरमन लक्ष्मण पवार, विठ्ठल चे संचालक तुकाराम मस्के, विठ्ठल पाटील व्यंकट भालके,नागेश भोसले, रिपाई नेते सुनील सर्वगोड, नागेश फाटे, रिपाई तालुकाध्यक्ष संतोष पवार ,हरीश दादा गायकवाड, अमरजित पाटील, दीपक वादडेकर, किरणराज घाडगे,रामभाऊ गायकवाड साईनाथ अभंगराव धनंजय कोताळकर ,दत्ता माने,शिवाजी मस्के, सुधीर भोसले,दत्ता भोसले,माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले,मोहन अनपट,ऍड सत्यम धुमाळ, अरुणभाऊ कोळी, सचिन पाटील ,संजय धुमाळ, अफझल सय्यद,सागर जाधव, भास्कर जगताप, दत्ता काळे सर्व पक्ष व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते