पंढरीत होणाऱ्या शिव महापुराण कथा सप्ताहात प्रदीप मिश्रा यांनी संविधान विरोधी वक्तव्य करू नये या साठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी
फुले शाहू आंबेडकर विचारमंचाने दिले निवेदन

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :- श्री विठ्ठल प्रतिष्ठानचे वतीने दिनांक 25 डिसेंबर ते 31डिसेंबर दरम्यान रोज पंडित प्रदीप मिश्रा यांचे शिव महापुराण कथा सप्ताहचे आयोजन केले आहें.मिश्रा यांचे मागील कार्यक्रमाचा आढावा घेतला तर ते संविधान विरोधी वक्तव्य करीत असून संविधान बदलून हिंदुराष्ट्राचा एजंडा आपल्या प्रवचनातून ते राबवित आहेत. त्या मुळे त्यांचेवर गुन्हे दाखल झाले आहेत.
पंढरी ही अध्यात्म नगरी असून सामाजिक समतेची भूमी आहें. तेव्हा येथील होणाऱ्या सप्ताहात मिश्रा यांनी संविधान विरोधी वक्तव्य करू नये या साठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी व आयोजकना जबाबदार समजुन समज द्यावी अशा मागण्याचे निवेदन फुले शाहू आंबेडकर विचारमंचाने दिले आहें. पोलीस उपनिरीक्षक सारिका शिंदे मॅडम व गोपनीय विभागाचे पवार सो यांनी निवेदन स्वीकारून वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
कायदा व सुव्यवस्था राखण्याची प्रशासनाची जबाबदारी आहें. समज देऊनही बेजबाबदार व संविधान विरोधी वर्तन मिश्रा यांनी केल्यास संविधान समर्थकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा या निवेदनात दिला आहें. या विचारमंचचे पदाधिकारी अध्यक्ष सुनील वाघमारे, उपाध्यक्ष ऍड. कीर्तिपाल सर्वगोड, भालचंद्र कांबळे, सचिव जितेंद्र बनसोडे सह सचिव ऍड. किशोर खिलारे, खजिनदार दादासो दोडके, गुरु दोडिया, राजेंद्र सर्वगोड,रवी सर्वगोड, नानासाहेब लोखंडे,जितेंद्र आठवले, सुकदेव माने, आदीच्या सह्या आहेत.
संभाजी ब्रिगेड, वंचित बहुजन आघाडी, श्रमिक मुक्ती दल व अन्य संघटनानी संविधान विरोधी मिश्रा यांना पायबंध घालावा अशी मागणी करून आयोजक अभिजित पाटील यांचे बाबत नाराजी व्यक्त केली आहें.