पुरोगामी संघर्ष परिषदेच्या कोरेगाव तालुका अध्यक्षपदी दत्तात्रय लेंबे

पुरोगामी संघर्ष परिषदेच्या कोरेगाव तालुकाध्यक्षपदी दत्तात्रय लेंबे यांना निवडीचे पत्र देताना प्रदेश महासचिव माननीय मारुतीराव बोभाटे, सातारा जिल्हा संघटक शब्बीर शेख व इतर
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
*सातारा*:- पुरोगामी संघर्ष परिषदेच्या कोरेगाव तालुकाध्यक्षपदी दत्तात्रय लेंबे राहणार (मसवे) यांची निवड करण्यात आली.
पुरोगामी संघर्ष परिषदेचे राज्याचे महासचिव मा. मारुतीराव बोभाटे यांच्या अध्यक्षतेखाली सातारा येथे झालेल्या बैठकीत त्यांना निवडीचे पत्र देऊन बोभाटे यांनी सत्कार केला.
स्वागत व प्रास्ताविक पुरोगामी संघर्ष परिषदेचे सातारा जिल्हा संघटक मा. शब्बीर शेख यांनी केले बैठकीस मार्गदर्शन करताना मारूतीराव बोभाटे म्हणाले पुरोगामी संघर्ष परिषद ही एक वैचारिक चळवळ असून, सर्व जाती-धर्मांच्या विचारांचा एक आदर्श असून जातीचे बांध ओलांडणारी पहिलीच चळवळ आहे. त्यामुळेच या संघटने मध्ये सर्व जाती धर्मांच्या लोकांचा ओढा असून भविष्यामध्ये एक निर्णायक आव्हान महाराष्ट्रा मध्ये उभा राहील असा आत्मविश्वासही त्यांनी शेवटी व्यक्त केला.