इंजिनिअरिंगच्या थेट द्वितिय वर्ष प्रवेशासाठी लागणार फक्त बारावीचा आसन क्रमांक व मार्कशीट
स्वेरी मध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध !

डिप्लोमाछायाचित्र: स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, स्वेरी चिन्ह व डिप्लोमाचे प्राचार्य डॉ.एन.डी. मिसाळ
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर-‘शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य (डी.टी.ई.) कडून पदविका अभियांत्रिकी अर्थात डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या थेट द्वितिय वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे.’ अशी माहिती गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ यांनी दिली.
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या थेट द्वितिय वर्षामध्ये प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे अत्यावश्यक आहे. त्या दृष्टीने डी.टी.ई.ने दिलेल्या माहितीनुसार नियमित शुल्कासह अर्जाची ऑनलाईन नोंदणी करण्याकरिता मंगळवार, दि.१३ जूलै २०२१ ते बुधवार, दि. ०४ ऑगस्ट २०२१ पर्यंत असा कालावधी दिला आहे. सदरील डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या थेट द्वितिय वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीचे वेळापत्रक व माहिती पुस्तिका तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याची सर्व संबंधित विद्यार्थी आणि पालक यांनी नोंद घ्यावी. विद्यार्थ्यांकडून हे प्रवेश अर्ज भरताना बऱ्याचदा चूका होत असतात. त्या दृष्टीने स्वेरी पदविका अभियांत्रिकी (एफ.सी. क्रमांक ६४३७) मध्ये ऑनलाईन अर्ज भरण्याची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर रजिस्ट्रेशन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवर्गाशी संबंधित कागदपत्रे, आधार कार्ड, फोटो आणि अर्जाचे शुल्क भरण्यासाठी एटीएम किंवा ऑनलाइन बँकिंगचे अॅप सोबत आणणे आवश्यक आहे. डिप्लोमा अभियांत्रिकीच्या थेट द्वितीय वर्ष प्रवेशाचा लाभ बारावी सायन्स, व्होकेशनल, एमसीव्हीसी आणि आय. टी.आय. मधून उत्तीर्ण होणारे विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी घेण्याचे आवाहन केले आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग डिप्लोमाचे प्रा. प्रकाश कदम (मोबा.क्र. ९९२१०३०६६९) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ यांनी केले आहे.
🙏🙏🙏👍