Uncategorized

बुद्धाच्या तत्त्वज्ञानाने एक तृतीयांश जग प्रभावित : डॉ. शरद गायकवाड

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

-श्रीकांत कसबे

पंढरपूर : तथागत गौतम बुद्धाच्या तत्त्वज्ञानाने एक तृतीयांश जग प्रभावित असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर येथील जेष्ठ विचारवंत प्रा.डॉ. शरद गायकवाड यांनी व्यक्त केले.
ते येथील शैक्षणिक क्रांती मंच यांच्या वतीने बुद्ध पौर्णिमेनिमित्तदि. 12मे रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे आयोजित करण्यात आलेल्या समाज प्रबोधनपर विशेष व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रीपूर येथील कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सह. साखर कारखान्याचे संचालक  किसनराव सरवदे (सर) होते. तसेच यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अहिल्यानगर येथील प्रसार माध्यमे व सामाजिक चळवळीचे अभ्यासक प्रा.डॉ. बापू चंदनशिवे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.


यावेळी डॉ. गायकवाड म्हणाले की, बुद्धतत्त्वज्ञानाने संपूर्ण जगाला गेली अडीच हजार वर्षांपासून प्रभावित केलेल् असून विवेकवादी, विज्ञानवादी आणि मानवतावादी विचारांची रुजवणूक बीजारोपण करून जगाला न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाची शिकवण बुद्धांनी आपल्या कृती युक्तीतून दिली.
भारत ही बुद्धाची जन्मभूमी अशी जगाला भारताची ओळख आहे. सिद्धार्थ गौतम बुद्ध हे मोक्षदाता नवे तर मार्गदाता आहेत.संपूर्ण भारत देश बुद्धतत्त्वज्ञानाने दीड हजार वर्षे बौद्ध पद्धतीने जगत आलेला होता परंतु मनुवादी मानसिकतेमुळे इथला धम्म येथे पराभूत झाला आणि संपूर्ण जगाने तो स्वीकारला आणि अंगीकारला म्हणून जग विकसित झाले. असे डॉ. गायकवाड म्हणाले.


प्रा. डॉ. बापू चंदनशिवे म्हणाले,बुद्ध हा सामाजिक व धार्मिक क्रांतीचा प्रवर्तक असून त्याने आयुष्यभर माणसाला केंद्रीभूत मानून काम केले. मनुवादाच्या विरोधात सम्यक क्रांती करीत प्रत्येकाला प्रबुद्ध होण्यासाठी आवश्यक ज्ञान मानवाला दिले. बुद्धाच्या ज्ञानाची जोड देऊन जीवन जगणे म्हणजे संबुद्ध होऊन जगणे आहे. बुद्ध प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पद्धतीचे युद्ध नाकारतो. तो कोणत्याही संघर्षावर संवादाने मार्ग निघू शकतो यावर विश्वास ठेवतो. जगाने बुद्धाच्या विचारावर मार्गक्रमण केल्यास कधीही युद्ध आणि संघर्ष उद्भवण्याची शक्यता नाहीच. प्रबुद्ध होणे हे जरी कठिण काम असले तरी त्याच्याशिवाय पर्याय नाही.
यावेळी प्रास्ताविक व स्वागत प्रा. डॉ. धनंजय साठे यांनी केले. सूत्रसंचालन दत्तात्रय कांबळे (सर) केले. आभार राजेंद्र कांबळे (सर) यांनी मानले. पाहुण्यांचा परिचय शिक्षण विस्तार अधिकारी डॉ.बिभीषण रणदिवे यांनी करुन दिला. कार्यकर्माचे सुरुवातीस विलास जगधने सर यांनी सामूहिक बुद्ध वंदना घेतली. संविधान उद्देशीकिचे वाचन प्रज्ञा दत्तात्रय पाटोळे यांनी केले.
या वेळी माजी उपनगराध्यक्ष  व रिपाई राज्यसंघटक सुनील सर्वगोड,  प. म. संघटक बाळासाहेब कसबे, एस के आयवळे (सर), सामाजिक कार्यकर्ते युवराज पवार,सोलापूर, फुले शाहू आंबेडकर विचार मंचाचे अध्यक्ष सुनील वाघमारे, सा. जोशाबा टाइम्सचे संपादक श्रीकांत कसबे,  रिपाई नेते  जितेंद्र बनसोडे, बसपाचे वरिष्ठ कार्यकर्ते  एल. एस. सोनकांबळे, माजी नगरसेवक  डी राज,सर्वगोड, आर पी कांबळे, बसपाचे जिल्हाध्यक्ष  भालचंद्र कांबळे, माजी नगरसेवक ऍड.उमेश पवार, गणेश खंदारे  प्रकाश भिंगारे, बामसेफचे राज्य अध्यक्ष  सचिन भंडारे (सर), विलास जगधने सर, ज्येष्ठ साहित्यिक  बा. ना.धांडोरे (सर),   प्राचार्य भारत खिलारे, प्राचार्य, महादेव लवटे, साहित्य प्रा  भास्कर बंगाळे,  बहुजन समता पार्टीचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग खिलारे,,  गौतम विद्यालयाचे मुख्याध्यापक नंदकुमार वाघमारे सर, माजी मुख्याध्यापक दादासाहेब दोडके सर,,  शैलेश आगवणे ( डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती) नितीन काळे, शंकर माने (सर), प्राचार्य तानाजी साळुंखे,ऍड..बादल यादव, ऍड. किशोर खिलारे, अजित खिलारे, अमित अवघडे, अमोल खिलारे सर, चंद्रकांत सातपुते सर,अमोल वाघमारे, निवास सातपुरे (सर)  पौर्णिमा जाधव यांचेसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आर. डी. पाराध्ये सर, भाऊसाहेब कांबळे सर, दत्तात्रय पाटोळे सर, माजी नगरसेवक उमेश पवार, डॉ. शिवाजी पाटोळे, सुनील आडगळे सर या सर्वांनी प्रयत्न केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close