Uncategorized

भारताचे संविधान हाच आमचा धर्मग्रंथ आहे. — रमेश राक्षे 

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

लातूर — राष्ट्रपिता ज्योतीराव फुले यांची विद्यार्थीनी आणि सत्यशोधक लहुजी साळवे यांची पुतणी मुक्ता साळवे यांनी 1853 साली मानवद्रोही ब्राम्हण धर्माविरूध्द लिहिलेल्या निबंधात आमचा धर्मग्रंथ कोणता ? आणि धर्मग्रंथ कोणता ?असा सवाल उपस्थित केला होता. त्याचे उत्तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 नोव्हेबर 195O रोजी भारतीय संविधानातून दिले. भारतीय संविधानच भारताच्या नागरीकांचा खरा धर्मग्रंथ आहे. असे प्रतिपादन पुण्यातील सुप्रसिद्ध विचारवंत – कार्यकर्ते रमेश राक्षे यांनी केले आहे.


लातूर येथील पत्रकारभवनमध्ये ‘लसाकम ‘ या सामाजिक संघटनेच्या वतीने सत्यशोधक लहुजी साळवे यांच्या जयंतीनिमीत्त आयोजित करण्यात आलेल्या ” लहुजी साळवे यांचे ब्राम्हणीकरण ; मातंग समाजाला गुलाम बनविण्याचे षढयंत्र ” या विषयावरील जाहिर सभेत राक्षे बोलत होते. अध्यक्षस्थपद ‘लसाकम ‘ चे जिल्हाध्यक्ष एकनाथ पलमटे यांनी भूषविले तर राज्यनियंत्रक नरसिंग घोडके, महासचिव राजकुमार नामवाड आणि राज्यउपाध्यक्ष मनोहर डाकरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
यावेळी पुढे बोलताना राक्षे पुढे म्हणाले की, अस्पृश्यतेचे कट्टर समर्थक बाळगंगाधर टिळक आणि वासुदेव बळवंत फडके या ब्राम्हणांचे गुरु लहुजींचे शिष्य बनविण्याचे उच्चवर्णीयांनी षढयंत्र रचले आणि लहुजींचे ब्राम्हणीकरण करण्यात ते यशस्वी झाले. ब्राम्हण विरोधी असलेल्या सत्यशोधक चळवळीत ज्योतीराव फुलेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्या लहुजींना परिवर्तनाच्या चळवळीपासून तोडण्यासाठी जाणीवपूर्वक रचलेला हा डाव आहे. ज्योतीराव फुले यांच्यापासून लहुजींना विभक्त करून लहुजी साळवे यांना प्रेरणा मानणाऱ्या मातंग समाजाला गुलाम बनविण्याचा हिंदुत्ववादयांकडून प्रयत्न चालू आहे. यासाठी मातंग समाजातील पुढाऱ्यांना वापरले जात आहे. मातंग समाजातील आज्ञानी आणि स्वार्थी पुढारी या षढयंत्रात अडकले आहेत. हे ओळखून मातंग समाजातील परिवर्तनवादी संस्था -संघटना आणि व्यक्तींनी लहुजींचे ब्राम्हणीकरण थांबविले पाहिजे. असे अवाहनही केले.


या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजयकुमार सूर्यवंशी केले.सूत्रसंचलन मधुकर दुवे आणि राजेश तोगरे यांनी केले तर श्यामसुंदर चव्हाण यांनी आभार मानले.
यावेळी सुप्रसिद्ध विचारवंत प्रा.डॉ. सुरेश वाघमारे, फकिरा दलाचे राज्याध्यक्ष सतीष कसबे, बीसेफचे प्रमुख दिपक साठे, सत्यशोधक समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष डि.एस. नरसिंगे , राज्यसरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष बी.बी. गायकवाड, मुक्ता साळवे महिला परिषदेच्या अध्यक्षा सुधाताई कांबळे, प्रा.मारोती गायकवाड, प्रा. इंगळे आदी मान्यवरांसह निलंगा, औसा, चाकूर, रेणापूर या तालूक्यातील कार्यकर्ते, महिला आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ‘ लसाकम ‘ चे कार्यकर्ते सर्वश्री राजेंद्र हजारे, नामदेव घोडके, शिरीष दिवेकर, दत्ता कांबळे, अनंत कसबे, बळीराम भोगे , नारायण कांबळे आदींनी परिश्रम घेतले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close