2ऑगस्ट रोजी प्रा. सुकुमार कांबळे यांचे व्याख्यान होणार
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे युवक संघटना जुनीपेठ यांचा उपक्रम


जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर :-साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे युवक संघटना जुनीपेठ यांचे वतीने साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे१०४ वी जयंती सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करीत आहे निमित्ताने गुरुवार, दि. १ ऑगस्ट सकाळी ९.०० वा. प्रतिमा पूजन सकाळी ९.३० ते सायं. ५.०००-रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.
•शुक्रवार, दि. २ ऑगस्ट २०२४०- सायं. ५.०० वाजता प्रा. सुकुमार कांबळे सर(सांगली )संस्थापक अध्यक्ष, डेमोक्रॉटीक पार्टी ऑफ इंडिया, महाराष्ट्र राज्य यांचे समाजप्रबोधनपर व्याख्यान होणार असून विषय : “साहित्यत्न आण्णाभाऊ साठे व मातंग समाज “ या विषयावर ते मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्रीकांत कसबे संपादक, जोशाबा टाईम्स हें असणार आहेत.
दिनांक ३ ऑगस्ट २०२४ सायं. ५.०० भव्य देखावा व डिजे मिरवणूकीने उत्सवाची सांगता होणार आहे.
तरी रामबाग रोड, अंबाबाई पटांगण, पंढरपूर येथे सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे. असे आवाहन अध्यक्ष औदुंबर वाघमारे, उपाध्यक्ष विकी रसाळ, खजिनदार ज्ञानेश्वर लोंढे यांनी केले आहे.





