Uncategorized
संभाजी ब्रिगेड पंढरपूर तालुकाध्यक्षपदी दिपक कवडे

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर-
प्रविणदादा गायकवाड यांच्या संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेची कुर्डुवाडी येथे नुकतीच मिटींग घेण्यात आली यामध्ये पंढरपूर तालुकाध्यक्षपदी गुरसाळे येथील दिपक देविदास कवडे यांची निवड करण्यात आली असून त्यांना निवडीचे पत्र प्रदेश संघटक दिपकदादा वाडदेकर, पुणे विभागीय अध्यक्ष शाम कदम, पुणे विभागीय उपाध्यक्ष भाई राजू मगर, सोलापूर विभाग जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले व पंढरपूर विभाग जिल्हाध्यक्ष प्रदिप मिसाळ यांच्याहस्ते देण्यात आले.

प्रदेश संघटक दिपकदादा वाडदेकर म्हणाले की, बुध्द,शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर हा परिवर्तनवादी विचार बहुजन समाजापर्यंत रूजविण्यासाठी संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटना तत्पर आहे. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी समाजकारणाबरोबरच अर्थकारण जपले पाहिजे. बहुजन समाजातील युवकांना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास संभाजी ब्रिगेड ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभी राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी पंढरपूर शहराध्यक्ष शनी महाराज घुले, पुणे शहर कार्याध्यक्ष कैलास कणसे, कुलदिप पाटील, अभिमान गायकवाड, विजय आरकिले, दिनेश गोडसे, हणुमंत आण्णा हजारे, दिपक विठ्ठल कवडे, कुमार रणदिवे, दिनेश नागटिळक, नागेश जाधव, शाहरूख मुरर्शद, मदन रणदिवे, ज्ञानेश्वर रणदिवे, कपील भुसनर, समाधान जाधव, महेश नरसाळे, अनिल मिसाळ, प्रकाश रणपिसे, बालाजी देशमुख यांच्यासह आदि उपस्थित होते.
यावेळी नुतन तालुकाध्यक्ष दिपक कवडे म्हणाले की, संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेच्या पंढरपूर तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्याने आता माझी जबाबदारी वाढली असून तालुक्यातील युवकांच्या माध्यमातून अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
