वंचित बहुजन आघाडी पंढरपूर शहर तालुका व समस्त कोळी महादेव समाजाचे वतीने भव्य हलगीनाद मोर्चा
अनुसचित जमातीचे (ST)प्रमाणपत्र व वैधता सुलभ पद्धतीने प्रमाणपत्र मिळावे ही मागणी

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :- मागील पन्नास वर्षांपासून महादेव कोळी समाजावर अन्याय होत असून अनेकदा प्रयत्न करूनही जातीचे दाखले दिले जात नाहीत. या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडी पंढरपूर शहर तालुका व समस्त कोळी महादेव समाजाचे वतीने कोळी महादेव समाजास अनुसचित जमातीचे (ST)प्रमाणपत्र व वैधता सुलभ पद्धतीने प्रमाणपत्र मिळावे म्हणून शासनाच्या विरोधात शुक्रवार दि. १६ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १०.०० वा हलगीनाद मोर्चा निघणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष श्रीशैल गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी बोलताना गायकवाड यांनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोळी समाजाला अनुसूचित जमाती मधून आरक्षण दिले आहे. मात्र महाराष्ट्रातील काही भागात जाणीवपूर्वक हे आरक्षण दिले जात नाही. यामुळे येथील कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे. आता कोळी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरणार असून यासाठी शुक्रवार दिनांक 16 रोजी पंढरपूर तहसील कार्यालयावर हलगी मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती दिली
यावेळी कोळी महादेव समाजाचे सुरेश शिंदे सर यांनी महादेव कोळी समाजास st प्रमाण पत्र लवकरात लवकर द्यावे अन्यथा कोळी समाज bjp विरोधात मतदान करेल. असा इशारा दिला.सोमनाथ अधटराव, दादा करकमकर,(महर्षी वाल्मिकी संघ )यांनीही आपली भूमिका व्यक्त केली.
भव्य हलगीनाद मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसिल पंढरपूर असा निघणार असून यावेळी अॅड. अरुण अबा जाधव राज्य समन्वय, इम्तियाज नदाफ प्रदेश प्रवक्ता महाराष्ट्र राज्य, सोमनाथ साळुंखे जि. निरीक्षक तथा राज्य उपाध्यक्ष,श्रीशैल गायकवाड (जिल्ह्यध्यक्ष सोलापुर) हें नेतृत्व करणार आहेत.भव्य हलगीनाद मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसिल पंढरपूर निघणार आहें तरी महादेव कोळी समाज बांधवानी व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे ही आवाहन राजाभाऊ शिंदे (शहराध्यक्ष)संतोष कांबळे (ता. अध्यक्ष) यांनी केले. यावेळी ,बिराप्पा मोटे सर, सुनील दंदाडे कोलेवार, अण्णा वाळके , संतोष कांबळे आदी उपस्थित होते.