पुरोगामी संघर्ष परिषदेने शाहुवाडी मध्ये केला नागरी सुविधांचा पंचनामा
*दहा वर्षापासून गटारीचे पाणी अंगणात साचते* *सांडपाणी वाहून नेण्याची गटारीची कामे अपूर्णच* *रात्रीच्या वेळी खांबवर लाईटची सोयच नाही

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
शाहूवाडी:- दि.७ फेब्रुवारी- पुरोगामी संघर्ष परिषदेच्यावतीने शाहूवाडी येथील शाहूनगर मध्ये गेल्या अनेक वर्षापासून सांडपाणी वाहून जाण्यासाठी गटारीची सोय नसल्यामुळे सगळे सांडपाणी अंगणामध्ये साचून त्याच्यावर डासांची पैदास होऊन आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे या व अशा अनेक तक्रारी पुरोगामी संघर्ष परिषदेच्या शाहूवाडी तालुक्याच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. रेणुका सोनावळे यांच्याकडे शाहूनगर मधील नागरिकांनी लेखी तक्रारी अर्ज दिल्यामुळे पुरोगामी संघर्ष परिषदेचे कोल्हापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष अमोल सोनावळे यांनी घटनास्थळी भेट देऊन तेथील नागरी सुविधांचा पंचनामाटरून सर्व परिसराचे चित्रीकरण करून छायाचित्रे सुद्धा काढली आहेत. नागरिकांच्या समक्ष पंचनामा झाल्यामुळे शाहुवाडीची ग्रामपंचायत नेमकं काय करते ? नागरिकांच्या आरोग्याशी का खेळ करते ?असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
आरोग्याचा अपुऱ्या नागरी सुविधामुळे प्रश्न निर्माण व्हावा हे खूप गांभीर्याचे असून लहान मुलांच्या भविष्याचा व नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा जीवघेणा प्रकार असल्यामुळे पुरोगामी संघर्ष परिषदेचे कोल्हापूर ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष अमोल सोनावळे यानी येत्या आठ दिवसात जर ग्रामपंचायतीने ताबडतोब कार्यवाही नाही केली तर, ग्रामपंचायतीवर लेकरा बाळा सहित मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात दिला आहे.
यावेळी पुरोगामी संघर्ष परिषदेच्या शाहूवाडी तालुक्याच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. रेणुका सोनावळे, जयश्री पाडळे, वैशाली माने, मनोज जाधव, सीताबाई जाधव, चंद्रकांत माने ,हौसाबाई माने, वसंत सोने, ममता गोसावी, संदीप गोसावी, तेजस खोत, ओंकार साठे इत्यादी अनेक नागरिक यावेळी उपस्थित होते.