कृ.श्री. क्षीरसागर हे शिक्षण क्षेत्रातील आदर्श होते–चं. मा. शिंदे

कृ.श्री. क्षीरसागर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या पप्रतिमेचे पूजन करताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे च. मा. शिंदे, ज्येष्ठ संचालक आप्पासाहेब चोपडे ,अनिरुद्ध सालविठ्ठल, संस्थेचे अध्यक्ष डॉ. मदन क्षीरसागर, मुंढे यू. आर.व इतर मान्यवर.
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर :कृ. श्री. क्षीरसागर हे शिक्षण क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व होते, त्यांचे कार्य सर्वांसाठी आदर्शवादी व प्रेरणादायी होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य तळागाळातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी वेचले असे साहित्यिक च.मा.शिंदे यांनी यांनी व्यक्त केले. श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ व जवाहरलाल शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव कै. कृ. श्री.क्षीरसागर यांच्या 20 व्या स्मृतिदिनानिमित्त ते प्रमुख पाहुणे बोलत होते. विवेकवर्धिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे कृ. श्री. क्षीरसागर प्रतिष्ठान च्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संचालक अनिरुद्ध सालविठ्ठल हे होते.त्यांनी के.एस. क्षीरसागर यांच्या आठवणी सांगितल्या.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाऊसाहेब जगताप यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर जवाहरलाल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुभाष सोनवणे, संस्थेचेअध्यक्ष डॉ.मदन क्षीरसागर, ज्येष्ठ संचालक आप्पासाहेब चोपडे, विवेक वर्धिनी व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य मुंढे यू. आर,पर्यवेक्षक सुनील पाटील, दत्त विद्या मंदिर सुस्ते चे मुख्याध्यापक सुधाकर पिसे,आश्रम शाळा वाखरीचे मुख्याध्यापक संजय मोरे, विवेक प्राथमिकच्या मुख्याध्यापिका अंजली अटकळे हे उपस्थीत होते.तसेच कार्यक्रमासाठी तंत्र विभाग प्रमुख नानासाहेब देवकते, अशोक पवार, मुख्य लिपिक हनुमंत मोरे,अधीक्षक अमोल हुंगे, शिवाजी येडवे, विक्रम बिस्किटे,आशा जमदाडे विलास पवार, मधुकर कलुब्रम्हे,शिवाजी सोमदळे, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी नीता कदम व संतोष पवार यांना यावर्षीचा प्रतिष्ठानचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचाही स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुक्तेश्वर मुळे यांनी केले.आभार विभाग प्रमुख संजय पवार यांनी मानले
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे सर्व सदस्य तसेच आश्रम शाळा वाखरी, दत्त विद्यामंदिर सुस्ते, विवेक वर्धिनी विद्यालय,पंढरपूर मधील सर्व विभगातील शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.