अनिल सावंत हेच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार; खा. डॉ.-अमोल कोल्हे…

अनिल सावंत हेच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार; खा. डॉ.-अमोल कोल्हे…
जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :-पंढरपूर मंगळवेढा मतदार संघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा असून पंढरपूर मंगळवेढ्याची जागा आमची आहे. अनिल सावंत हेच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. मतदारांनी कोणताही संभ्रम बाळगण्याचे कारण नाही. अशी स्पष्ट भूमिका खा. डॉ.अमोल कोल्हे यांनी पत्रकारा समोर व्यक्त केली. राष्ट्रीय नेते शरद पवार पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आणि खा.सुप्रिया सुळे या तिघांपैकी कोणाची सभा घ्यायची याचे नियोजन सुरू आहे. पवार साहेब या मतदारसंघात सभा घेणार नाहीत, ही अफवा आहे. मतदारांनी यावर विश्वास ठेवू नये. पंढरपूर मंगळवेढाची जागा पूर्ण तकतीनिशी लढत आहे.खरंतर भगीरथ भालके हे उमेदवार काँग्रेसचेच आहेत का, हे काँग्रेसने तपासणे आवश्यक आहे. राष्ट्रवादी मधून बीआरएस पक्षात गेले, आणि बीआरएस मधून आता काँग्रेसमध्ये आले आहेत. सगळ्या पक्षातून फिरून आलेल्या उमेदवारांना निवडणुकीमध्ये