प्रा.डॉ.वामन साळवे यांचा माहिती अधिकार उत्कृष्टता राष्ट्रीय पुरस्काराने गौरव
२८ वे राष्ट्रीय शैक्षणिक अधिवेशनात शिरोडा- गोवा येथे स्मरणिकेचे प्रकाशन करताना प्रमुख पाहुणे गोवा राज्याचे कला व सांस्कृतिक मंत्री ना.गोविंद गावडे, .अध्यक्ष रमेश कुळकर्णी, डॉ वामन साळवे, व इतर मान्यवर.
जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर :-यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी( यशदा)पुणे येथील माहितीचा अधिकार दूर शिक्षण अभ्यासक्रम अंतर्गत माजी प्रशिक्षणार्थी प्रा. डॉ. वामन निंबाजी साळवे यांना गोवा शिक्षक विकास परिषदेच्या २८ वे राष्ट्रीय शैक्षणिक अधिवेशनात शिरोडा- गोवा येथे माहिती अधिकार उत्कृष्टता राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शिक्षक विकास परिषदेचे दोन दिवसीय अधिवेशन दि. १६-१७ नोव्हेंबर२०२४ रोजी शिरोडा (गोवा)येथे संपन्न झाले. २८ वे राष्ट्रीय शैक्षणिक अधिवेशनात शिक्षक विकास परिषदेचे स्मरणिकेचे प्रकाशन प्रमुख पाहुणे गोवा राज्याचे कला व सांस्कृतिक मंत्री मा. गोविंद गावडे , शिक्षक विकास परिषदेचे अध्यक्ष रमेश कुळकर्णी , सचिव मारुती कुंभार, कार्यक्रमाचे पाहुणे प्रा.डॉ. वामन साळवे , मुख्याध्यापिका सौ.अलपा देसाई , सुरज नाईक , मुठा पुखराज व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.डॉ.वामन साळवे यांना माहिती अधिकार उत्कृष्टता राष्ट्रीय पुरस्कार शिक्षक विकास परिषदेचे वतीने प्रदान करुन त्यांना सन्मानित करण्यात आले.तसेच शैक्षणिक, साहित्यिक, कला, सांस्कृतीक, सामाजिक क्षेत्रांतील व्यक्तींना राष्ट्रीय व राज्य स्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. गोवा राज्याचे कला व सांस्कृतीक उपसंचालक मा. दिनेश पवार यांना सन्मानित करण्यात आले.श्री. गोपाळ गुरव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्री . वेळगेकर, सौ.पुषपा गायतोंडे,सहसचिव सतीश वेळीप, खजीनदार दौलतराव खानविलकर, पद्मनाभ देसाई, शंकर बुडके, सौ. ॲलन बोरजीस, वसंतराव महाडिक,पत्रकार तुकाराम शेटगांवकर , पांडुरंग सुतार, नरसु पाटील सौ. प्रफुल्ला सावंत देसाई, सौ. रेणुका फळ देसाई, श्रीमती माधुरी गावस, सौ.प्रतिभा प्रभुगांवकर ,राज्य व राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते.