सहकार शिरोमणी वसंतदादा काळे साखर कारखाना राज्यातील शिवसेनेचा पहिला कारखाना –साईनाथ अभंगराव
शिवसेना (ठाकरे) चा काळे गटाला जाहीर पाठिंबा

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर :-:- सहकार शिरोमणी वसंतदादा काळे साखर कारखाना राज्यातील शिवसेनेचा पहिला कारखाना असून या कारखान्याच्या निवडणूकत सेनेचे चार संचालक निवडून आले होते. त्यामुळे शिवसेना ही या कारखान्याच्या निवडणुकी पासून कधीच अलिप्त रहात नाही. त्या मुळे या निवडणुकीत शिवसेनेचा कल्याणराव काळे गटाला जाहीर पाठिंबा देत असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे नेते साईनाथ अंभंगराव यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
यावेळी जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, कल्याणराव काळे, भागीरथ भालके संजय अभंगराव, जयवंत माने आदी उपस्थित होते.
यावेळी कल्याणराव काळे म्हणाले की, विरोधकांनी टीका जरूर करावी पण आपली पातळी सोडू नये. कधी नव्हे ते या निवडणुकीत पातळी सोडून प्रचार सुरु झाला आहे.याला सभासद योग्य उत्तर देतील.जे सभासद नाहीत अशांचा प्रवेश करून दिशाभूल करण्याचे राजकारण सुरु असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.