वसंतनाना देशमुख यांचा ६१ व्या वाढदिवसानिमित्त ग्रामस्थांच्यावतीने नागरी सत्कार सोहळा होणार..
18 जानेवारी रोजी कासेगाव येथे मान्यवरांचे उपस्थितीत होणार जंगी कार्यक्रम

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर :- कासेगाव जिल्हा परिषद सदस्य, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन व विद्यमान संचालक वसंतनाना देशमुख यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा ग्रामस्थांच्यावतीने नागरी सत्कार सोहळा आयोजन करण्यात आले असल्याची माहिती वसंतनाना देशमुख भव्य नागरी सत्कार सोहळा समितीच्या वतीने पत्रकाद्वारे देण्यात आली.
कासेगाव जिल्हा परिषद गटात कायम आपले राजकीय वर्चस्व राखून असलेले आणि जनसामान्यातील व्यक्तिमत्व अशी वसंत नाना देशमुख यांची आजपर्यंतची ओळख आहे. त्यांच्या कर्तृत्वामुळे कासेगाव ग्रामपंचायत व जिल्हा परिषद गटातील मित्रपरिवाराच्या वतीने ६१ व्या वाढदिवसा निमित्त भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे.
गुरुवार दि. १८ रोजी सायंकाळी ५ वाजता कासेगाव येथील दौलतराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कार्यस्थळावर हा सत्कार सोहळा संपन्न होणार आहे .या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते -पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न होणार आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध कायदे तज्ञ सरकारी वकील उज्वल निकम हे आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून सांगलीचे खासदार संजय काका पाटील, सोलापूर खासदार जयसिद्धेश्वर स्वामी ,आ.विजयकुमार देशमुख, आ. रणजितसिंह मोहिते- पाटील , मा. आ. प्रशांत परिचारक, मोहोळचे मा. आ. राजन पाटील, अक्कलकोटचे आ. सचिन कल्याणशेट्टी, सांगोल्याचे शिंदे गटाचे आ. शहाजी पाटील , पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे, मोहोळचे आमदार यशवंत माने, आटपाडीचे माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख, माजी आमदार दिलीप माने, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे, माजी महसूल आयुक्त प्रभाकर देशमुख ,सांगली जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख, शिवसेना शिंदे गटाचे नेते शिवाजी सावंत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पंढरपूर शहर व तालुक्यातील सभासद, शेतकरी ,नागरिक ,कामगार यांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास कासेगाव येथे उपस्थित राहण्याचे आवाहन सत्कारमूर्ती वसंतनाना देशमुख भव्य नागरी सत्कार सोहळा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.



