Uncategorized

विवेक वर्धिनी विद्यालयाचे रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धेतील यश

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर :-विवेक वर्धिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पंढरपूर या प्रशालेने- सोलापूर जिल्हा कलाध्यापक संघ सोलापूर यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धेत नेत्रदिपक यश मिळवले आहे. या स्पर्धेमध्ये प्रशालेतील पुढील विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे. रंगभरण स्पर्धेत शर्वरी सातपुते, गायत्री कुंभार, मयुरी करंजकर, हस्ताक्षर स्पर्धेत- साक्षी मासाळ, सोफिया तांबोळी. या सर्व विद्यार्थ्यांना कलाध्यापक संघातर्फे-स्मृती चिन्ह, प्रमाणपत्र देण्यात आले. या रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धेत एकूण 275 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता यामध्ये 26 विद्यार्थ्यांनी-उत्तेजनार्थ प्रमाणपत्र मिळवून यश संपादन केली आहेत तसेच प्रशालेचे कलाशिक्षक मल्लिकार्जुन गुरव यांना सोलापूर जिल्हा कलाध्यापक संघातर्फे “उपक्रमशील कलाध्यापक” म्हणून पुरस्कार मिळालेला आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष-डॉ मदन क्षिरसागर, उपाध्यक्ष प्रा-शिवाजी वाघ, सचिव-अॕड वैभव टोमके, सहसचिव-अजित नडगीरे, खजिनदार-सलीम वडगावकर, ज्येष्ठ संचालक-मुकुंद देवधर, आप्पासाहेब चोपडे, अनिरुद्ध सालविठ्ठल, दिलीप घाडगे, विजयकुमार, माळवदकर, प्राचार्य राजेंद्र पाराध्ये, उप मुख्या- तुकाराम कौलगे, पर्यवेक्षक-सुनील पाटील, तसेच राजूभाई मुलाणी ,शिवाजी येडवे, विलास पवार, संजय पवार व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close