रोहन परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जिल्हा स्तरीय खो-खो स्पर्धेत अर्धनारी नटेश्वर वेळापूर- प्रथम तर किरण स्पोर्ट्स सोलापूर द्वितीय

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
-श्रीकांत कसबे
मंगळवेढा प्रतींनिधी :- युटोपियन शुगर्स लि. कचरेवाडी ता . मंगळवेढा या कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन परिचारक यांच्या वाढदिवसा निमीत्त युटोपियन शुगर्स येथे आयोजित जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत अर्धनारी नटेश्वर वेळापूर या संघाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर द्वितीय क्रमांक किरण स्पोर्ट्स सोलापूर यांना मिळाला आहे.
युटोपियन शुगर्स यांनी आयोजित केलेल्या खो खो स्पर्धेत सर्वच सामने अत्यंत चुरशीचे झाले. अर्धनारी नटेश्वर वेळापूर या संघाने 3 गुणांनी किरण स्पोर्ट्स सोलापूर या संघावर मात करीत रोख रक्कम रु. १५१११/- व मानाची ट्रॉफी वर आपले नाव कोरले आहे. तर द्वितीय क्रमांकाचे रक्कम रु. १११११/- व ट्रॉफी चे मानकरी ठरले आहेत किरण स्पोर्ट्स सोलापूर , तृतीय क्रमांक शिवप्रतिष्ठान मंगळवेढा या संघास मिळाला असून रक्कम रु. ७१११ व ट्रॉफी तर उत्कर्ष क्रीडा मंडळ सोलापूर हा संघ चतुर्थ क्रमांक रु ४१११ ट्रॉफी चे मानकरी ठरले आहेत. यावेळी काही वैयक्तिक बक्षिसे ही देण्यात आली आहेत.
यावेळी युटोपियन शुगर्स चे चेअरमन उमेश परिचारक यांनी ही सामन्याचा आनंद घेत खेळाडू यांना प्रोत्साहन दिले. त्यांच्याच प्रमुख उपस्थिती मध्ये व कृषि उत्पन्न बाजार समिती पंढरपूर चे नूतन उपसभापती राजू (बापू) गावडे, माजी सभापती दिलीप आप्पा घाडगे ,संचालक नागनाथ मोहिते, अरुण नागटिळक, महादेव लवटे तानाजी पवार, शुक्राचार्य गवळी , कर्मयोगी पतसंस्थेचे संचालक सी.एन. देशपांडे , उद्योगपती पंकजभाई शहा, प्रगतशील बागायतदार सुरेश टिकोरे, सोमनाथ आतकरे,वैभव काका डोळे यांच्या शुभहस्ते व प्रमुख उपस्थितीत परितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला.
सदरच्या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ए. एम. स्पोर्ट्स डोणज ता. मंगळवेढा यांचे विशेष सहकार्य लाभले बद्दल कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक यांनी सुनील पुजारी व पंच अनिल लिगाडे,संदीप अनंतपुरे, रोहित लिगाडे, अविनाश कोळी यांचा विशेष सन्मान केला.या स्पर्धेला सोलापूर अॅम्युचर खो-खो असोसिएशन सोलापूर यांचे मार्गदर्शन लाभले.
या वेळी कारखान्याचे सर्व खातेप्रमुख ,अधिकारी, व कर्मचारी वर्ग यांचे समवेत कारखान्याचे ऊस उत्पादक , तोडणी वाहतूक ठेकेदार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.