वाढदिवसानिमीत्त रक्तदान रुपी शुभेच्छा द्याव्यात – आ.समाधान आवताडे
आ.समाधान आवताडे यांचे वाढदिवसानिमीत्त २१ नोव्हेंबर रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपुर:- माझ्या वाढदिवसानिमीत्त पुष्प हार,गुच्छ देऊन केक कापुन व फटाकड्याची आतिशबाजी करुन ,होर्डिंगबाजी,बँनरबाजी करुन अनेकजण, मित्रपरिवार, पक्ष सहकारी,कार्यकर्ते करीत असतात.परंतू यंदा माझी विनंती आहे की, यापेक्षा आगळी वेगळी करण्याच्या हेतूने“संकल्प रक्तदानाचा,मानवसेवेचा”हा रक्तदानाचा संकल्प घेऊन रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.आपण रक्तदान रुपी शुभेच्छा द्याव्यात .हेच मला शूभेच्छा व आशिर्वाद आहे असे आवहान आ.समाधान आवताडे यांनी केले आहे.
समाजाचे ऋण फेडण्याची संधी रक्तदानामुळे मिळते.आपल्या रक्तदाना मुळे एकाद्याचा अनमोल जीवन वाचू शकते. मानवसेवा या भावनेतून आपण सर्वांनी मिळून माझ्या जन्मदिनानिमित्त रक्तदानाचा संकल्प सिध्दीस न्यावे असे आवहान आ.समाधान आवताडे यांनी केले आहे.
२१नोव्हेंबर भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन आ.समाधान आवताडे यांचे संपर्क कार्यालय मंगळवेढा येथे ९:००ते ५:००यावेळत घेण्यात येणार आहे.