विवेक शिक्षक सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

विवेक शिक्षक सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर- येथील विवेक शिक्षक सहकारी पतसंस्थेची 53 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.या सभेच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे चेअरमन सुनिता नडगीरे ह्या होत्या. प्रमुख पाहुणे प्राचार्य
राजेंद्र पाराध्ये हे होते.यावेळी पतसंस्थेच्या सभासदांना लाभांशाचे वाटप करण्यात आले.तसेच पतसंस्थेच्या कामाबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले.यावेळी व्यासपीठावर उपमुख्याध्यापक तुकाराम कौलगे, पर्यवेक्षक सुनील पाटील,ज्युनिअर विभाग प्रमुख उत्तरेश्वर मुंढे,संजय पवार,दत्त विद्या मंदिर चे मुख्याध्यापक अशोक बनसोडे,पतसंस्थेचे सचिव रणजीत शिनगारे उपाध्यक्ष विवेक चौगुले, मुख्य लिपिक हनुमंत मोरे, राजेंद्र ढगे व सर्व संचालक सदस्य उपस्थित होते.यावेळी नगरसेवक संजय निंबाळकर,वसतीगृह अधीक्षकअमोल हुंगे,संचालक संजय क्षीरसागर, नारायण कांबळे,अनिल सोनार, अर्जुन चवरे,अनिल जाधव तसेच सर्व सभासद शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन राजुभाई मुलाणी, शिवाजी येडवे यांनी केले तर आभार सिताराम मासाळ यांनी मानले.