प्राचार्य राजेंद्र पाराध्ये “पंढरीरत्न” पुरस्काराने सन्मानित

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर :-विवेकवर्धिनी विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र पाराध्ये यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने” पंढरी रत्न” हा पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डी. राज सर्वगोड यांच्या उपस्थितीत ह.भ.प गहिनीनाथ महाराज, विठ्ठल चे चेअरमन अभिजीत पाटील, स्वेरी कॉलेजचे डॉ.बी.पी.रोंगे,सिने अभिनेता राहुल हजारे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देऊन त्यांना सपत्निक गौरवण्यात आले. पाराध्ये हे गेली 36 वर्षे विवेक वर्धिनी येथे कार्यरत असून त्यांनी अनेक उपक्रमशील कार्यक्रम प्रशालेमध्ये राबवले आहेत त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला याबद्दल पाराध्ये यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.