विवेक वर्धिनी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना प्राचार्य राजेंद्र पाराध्ये व इतर शिक्षक
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर :-विवेक वर्धिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पंढरपूर येथे भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. प्रशालेचे प्राचार्य राजेंद्र पाराध्ये यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी तुकाराम मस्के व पोपट काळेल,शिवाजी येडवे यांनी आंबेडकरांच्या जीवनावर आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी उपमुख्याध्यापक तुकाराम कौलगे,उत्तरेश्वर मुंढे, विभाग प्रमुख संजय पवार, तंत्र विभाग प्रमुख नानासाहेब देवकते,मुख्य लिपिक हनुमंत मोरे, अधीक्षक अमोल हुंगे, हे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली म्हेत्रे, राजूभाई मुलाणी यांनी केले तर मधुकर भोसले यांनी सर्वांचे आभार मानले कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.