अशोक ननवरे यांची महाराष्ट्र योगशिक्षक संघाच्या सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदी निवड

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर :-: योग विद्या धाम पंढरपूर चे संस्थापक अध्यक्ष, अशोक ननवरे यांची महाराष्ट्र योगशिक्षक संघाच्या सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाली आहे. अशोक ननवरे हे सन 1989 पासून सोलापूर जिल्ह्यात सातत्याने 35 वर्षे योगशास्त्राच्या प्रचार – प्रसाराचे कार्य करीत आहेत, स्वतः ननवरे सरांनी योग विद्या गुरुकुल नाशिक येथून योगपंडित, योगप्राध्यापक ही योगातील उच्च पदवीप्राप्त केली असून कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ, नागपूर येथून योगशास्त्रात एम. ए. केलेले आहे, पाटबंधारे विभागातून ते 31मे 2022 ला शाखा अभियंता पदावरून सेवानिवृत्त झाले असून आता ते पूर्णवेळ योग, आयुर्वेद, व निसर्ग उपचार क्षेत्रात निरपेक्ष पणे काम करीत आहेत,सोलापूर जिल्ह्यातील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी शासन ” मान्यताप्राप्त योगशिक्षक ” व्हावे म्हणून ननवरे सर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व आयुष मंत्रालय मान्यताप्राप्त ” योगशिक्षक पदविका “ अभ्यास केंद्र चालवतात, या व्यक्तीरिक्त योगाथेरेपी, पर्यायी वैद्यकशास्त्र, निसर्गउपचार व आयुर्वेद संशोधन क्षेत्रात नव तरुणांनी काम करावे यासाठी श्री ननवरे सर सातत्याने कार्य करीत आहेत,शासनाच्या पातळीवर योगशिक्षकांना पूर्णवेळ नोकरीत घ्यावे, शाळा, महाविद्यालयात योगशिक्षकांची कायमस्वरूपी पदे भरून योगशिक्षकांना शासनाने नोकरीची संधी द्यावी, म्हणून महाराष्ट्र योगशिक्षक संघ काम करीत आहे, त्यामध्ये ननवरे सरांचे या क्षेत्रातील योगदान पाहून महाराष्ट्र योगशिक्षक संघाने सोलापूर जिल्हास्तरावर श्री. अशोक ननवरे सरांनी काम करावे म्हणून निवडीचे पत्र दिलेले आहे.
अशोक ननवरे सरांना निवडीनंतर संपर्क केला असता त्यांनी या बाबतीत सागितले की, पद मिळाले की जबाबदारी वाढते, मी सोलापूर जिल्ह्यातील शासनमान्य योगशिक्षकांसाठी तळमळीने कार्य करेन, आता व भविष्यात योगाला चांगले दिवस येत आहेत, भारतीय योगशिक्षकांना परदेशात खुप मागणी आहे, योगाच्या क्षेत्रात उत्तम करियर करण्याची संधी आहे. या क्षेत्रात जास्तीत जास्त तरुणांनी यावे व स्वतः योगशिक्षक होऊन सामाजाची सेवा करावी आपले, परिवाराचे व समाजाच्या उत्तम आरोग्यासाठी व रोजगाराची नवीन संधी म्हणून याकडे पहावे आम्ही मदतीसाठी तयार आहोत असे आवाहन केले.