Uncategorized

संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मिती साठी अण्णाभाऊ साठे यांचा सिंहाचा वाटा:सुनिलअडगळे 

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर :-तुळशी तालुका माढा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्ताने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ व गुरुजन कौतुक सोहळा आणि सुनील अडगळे यांचे परिवर्तनवादी व्याख्यान संपन्न झाले.प्रमुख वक्ते सुनील अडगळे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा सिंहाचा वाटा आहे असे मत व्यक्त करताना अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत वाढले जगले याच विदारक परिस्थितीचे वर्णन आपल्या साहित्यामध्ये करताना अन्यायच्या विरोधात पेटून उठणाऱ्या सर्वसामान्य लोकांना त्यांनी नायक बनवले कथा कादंबऱ्या पोवाडे छक्कड इत्यादीच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे मोलाचे कार्य केले असे सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून शिवाजी कांबळे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार सांगताना सर्वसामान्य कष्टकरीच्या प्रश्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आपल्या लेखणीच्या माध्यमातून मांडले या विचारांचे पाईक होताना असे समाज उपयोगी उपक्रम घेऊन महापुरुषांचे विचार समाजात पेरण्याची गरज आहे असे प्रतिपादन त्यांनी केले

गटशिक्षणाधिकारी डॉ.बिभीषण रणदिवे. यांनी लोकशाहीर अण्णाभाऊंच्या कार्याला उजाळा देताना फुले शाहू आंबेडकरांचे विचार सर्वां पर्यंत पोचवून अन्याय अज्ञान अंधश्रद्धा विषमता दूर करण्यासाठी अण्णाभाऊंचे विचार अमलात आणणे गरजेचे आहे. असे विचार मांडले. यावेळी विलास पाटोळे,दादा तळेकर दत्तात्रय कांबळे सर,आदींनी बहुमोल विचार मांडले.

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील विजेते.

1ली ते4थी -सृष्टी राजेंद्र माने प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक समर्थ तात्या जवंजाळ.

गट क्रमांक दोन पाचवी ते दहावी प्रथम क्रमांक विश्वजीत व्यंकटेश व्यवहारे

द्वितीय क्रमांक श्लोका दत्तात्रय ढोणे

तृतीय क्रमांक गौरवी महेश शिंदे

उत्तेजनार्थ गायत्री विकास वाघमोडे ईश्वरी वैजनाथ आवटे ऋतुजा अरविंद वाघमोडे आर्या प्रकाश व्यवहारे श्रावणी दगडे वैष्णवी सुरेश दगडे.

गट क्रमांक अकरावी बारावी प्रथम क्रमांक साक्षी हनुमंत पंढरी

खुल्या गटात  प्रथम क्रमांक गायत्री महादेव कुंभार

द्वितीय क्रमांक रोहन तानाजी खिलारे.

यांना सन्मानचिन्ह सन्मानपत्र रोख पारितोषिक रक्कम देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला. तसेच ग्रामीण भागामध्ये शैक्षणिक कार्य करताना समाज घडवण्याचे मोलाचे कार्य करणारे गुरुजन यांचा गौरव सोहळा संपन्न झाला. यावेळी कैलास जाधव, विलास पाटोळे, मनोज शहा,शंकर लोखंडे, दत्तात्रय चव्हाण,दादा तळेकर,   जिल्ह्यातील सर्व स्पर्धक पालक व तुळशीतील सर्व ग्रामस्थ माता-भगिनी  उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वीर फकीरा फाउंडेशन ने विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक शरद लोखंडे यांनी केले सूत्रसंचालन बापूराव खांडेकर यांनी तर आभार प्रमोद वसेकर यांनी मानले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close