Uncategorized
पुरोगामी संघर्ष परिषदेचे सबलीकरण योजनेसाठी कृष्णा नदीत जलबुडी आंदोलन -मल्हारी चव्हाण
आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे करणार

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
सांगली:-पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संघर्ष नायक प्रा.सुभाष वायदंडे यांचे नेतृत्वाखाली समाज कल्याण विभागाकडील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना ही जाचक अटीमुळे केवळ मृगजळच ठरल्यामुळे या योजनेतील जाचकअटी काढून योजना मागासवर्गीयांना मिळावी म्हणून व अर्थसंकल्पीय अधिवेशनात याच्यावर चर्चा होऊन तातडीने निर्णय घेण्यासाठी राज्य शासनाचे लक्ष वेधून चर्चा घडवून यावी म्हणून शुक्रवार दिनांक 10 मार्च रोजी दुपारी ठीक 02:00 वाजता सांगली येथील कृष्णा नदीत जलबुडी आंदोलन करणार असल्याची माहिती पुरोगामी संघर्ष परिषदेचे वरिष्ठ जिल्हाध्यक्ष मल्हारी चव्हाण यांनी दिली आहे.