विवेक वर्धिनी येथे महिलांचा सत्कार

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
संपादक-श्रीकांत कसबे
पंढरपूर :- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला दिनानिमित्त विवेक वर्धिनी विद्यालय पंढरपूर येथे महिला दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य राजेंद्र पाराध्ये हे उपस्थित होते. आजच्या मुलींनी उच्च शिक्षण घेऊन जागतिक स्तरावर आपले नाव लौकिक करावे व महिलांची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करावा असे आव्हान त्यांनी यावेळी केले. यावेळी प्रशालेतील नववीच्या वर्गातील विद्यार्थिनींनी महिला दिनानिमित्त स्त्रियांचे महत्त्व, स्त्रियांचे समाजातील स्थान, स्त्रियांच्या प्रगतीसाठी काय करावे या संदर्भात आपल्या भाषणातून विचार व्यक्त केले. प्रशालेतील शिक्षिका वैशाली म्हेत्रे यांनी आजच्या मुलींनी प्रत्येक क्षेत्रामध्ये धाडसाने समोर यावे व आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवा असे आपल्या मनोगत सांगितले.यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांना गुलाब गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी
उपमुख्याध्यापक तुकाराम कौलगे, पर्यवेक्षक सुनील पाटील ,सांस्कृतिक विभाग प्रमुख शिवाजी येडवे,
राजुभाई मुलाणी,संजय क्षीरसागर, सुनिल विश्वासे,सतीश भंडारे, अंजली म्हेत्रे, श्रीकांत चव्हाण सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.