जनतेच्या विकास योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आक्रमक व्हा –प्रा. सुभाष वायदंडे

पुरोगामी संघर्ष परिषदेची इस्लामपूर येथे शासकीय विश्रामगृहावर बैठक संपन्न झाली यावेळी राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे, प्रदेशाध्यक्ष प्राचार्य बाळासाहेब साठे, राज्य सरचिटणीस युवराज सोनवले,अंकुशभोंडे, सुनिता खटावकर व इतर
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
इस्लामपूर:- राज्यातील नागरिकांच्या कडून विविध करांच्या रूपाने महसूल गोळा करून शासनाची तिजोरी भरण्याचं काम महसूलचे अधिकारी करत असतात आणि हाच निधी नागरिकांच्या विविधविकास योजनांसाठी वापरला जातो.तो वापरत असताना संबंधित खात्याचे मंत्री आणि अधिकारी यांनी जनतेचे नोकर म्हणून काम करायचे असते परंतु हे स्वतःच या पैशाचे मालक असल्याच्या अविर्भावात असल्यामुळे सदर निधी विकास योजना वर योग्य व वेळेत खर्ची पडताना दिसत नसल्यामुळे त्यातल्या त्यात मागासवर्गीयांच्या अनेक योजना या प्रभावीपणे राबत नसल्यामुळे पुरोगामी संघर्ष परिषदेच्या प्रत्येक गावातील कार्यकर्त्याने व पदाधिकाऱ्यांनी संबंधित्यांना जाब विचारून आक्रमक राहून या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणीवणी करून घ्या असा इशारा वजा कानमंत्र पुरोगामी संघर्ष परिषदेच्या इस्लामपूर येथे शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पश्चिम महाराष्ट्राच्या बैठकीत पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संघर्षनायक प्रा. सुभाष वायदंडे यांनी दिला.
पुढे बोलताना प्रा.वायदंडेे म्हणाले मागासवर्गीयांच्या अनेक योजनांना खिळ घालून सदर मागासवर्गीयांचा निधी इतर योजनांकडे वळवल्याचे चित्र तुम्हाला पाहायला मिळेल म्हणून प्रत्येक कार्यालयामध्ये जाऊन याची माहिती घ्या व अधिकाऱ्यांना जाणीव करून देण्याचे सांगितले.
सदर बैठकीस प्रदेशाध्यक्ष प्राचार्य बाळासाहेब साठे, राज्य सरचिटणीस युवराज (तात्या) सोनवले, युवकचे राज्य उपाध्यक्ष अंकुश (भाऊ )भोंडे, राज्य उपाध्यक्षा (महिला आघाडी) सौ.सुनीता खटावकर, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष गणेश घाटगे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अविनाश कांबळे, पश्चिम महाराष्ट्र (युवती )अध्यक्षा संगीता भोंडे, सातारा जिल्हा अध्यक्षा सुकेशिनी साठे, सांगली जिल्हा अध्यक्षा सौ. वनिता सोनावले, सातारा जिल्हा अध्यक्ष इंद्रजीत चव्हाण, सांगली जिल्हा अध्यक्ष मल्हारी चव्हाण, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष दौलत घाटगे, सांगली जिल्हा युवक अध्यक्ष अक्षय खुडे, सोलापूर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष शंकर कांबळे, सोलापूर महिला आघाडी जिल्हाध्यक्षा ज्योती अवघडे, कोल्हापूर जिल्हा अध्यक्षा साबेरा इंगळे, पुणे जिल्हा अध्यक्ष प्रियांका कांबळे,सातारा युवती जिल्हाध्यक्षा कोमल लोकरे, सांगली महापालिका क्षेत्र अध्यक्षा सुजाता कांबळे, सांगली शहर जिल्हा अध्यक्षा सिला बनसोडे,सातारा तालुका अध्यक्षा संगीता जाधव, इत्यादी पुरोगामी संघर्ष परिषदेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर बैठकीचे नियोजन वाळवा तालुका अध्यक्ष सरपंच शिवाजी सकटे यांनी केले.