आणि ते मंगल झाले” पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे 2 फेब्रुवारी रोजी आयोजन!

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर :-पालवी संस्थेच्या संस्थापिका व असंख्य एड्सग्रस्त बालकांचे जीवन उजळून टाकणाऱ्या मंगलताई शहा यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासावर आधारित “आणि ते मंगल झाले” या जोहडकार सुरेखा शहा लिखित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा गुरुवारी (ता.२ फेब्रुवारी) आयोजित करण्यात आला आहे. आमदार प्रशांत परिचारक , भागवताचार्य व ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे, ह. भ. प. डॉ. जयवंत महाराज बोधले, व लेखिका सुरेखा शहा या मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन संपन्न होणार आहे. पंढरपूर अर्बन बँकेच्या खवा बाजार येथील कर्मयोगी सभागृहामध्ये गुरुवारी सायंकाळी ४:३० वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी पंढरपूर परिसरातील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन पालवी संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.