Uncategorized

कल्याण येथे “आपलं प्रतिष्ठान” ह्या नव्या संघटनेची स्थापना

कोरोना समुपदेशन समिती बरखास्त

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

कल्याण- कोरोना समुपदेशन समिती बरखास्त करण्यात आली असून “आपलं प्रतिष्ठान“ह्या नावाची नविन संघटना स्थापन करण्यात आली असल्याची घोषणा समितिचे अध्यक्ष अनिल काकडे यांनी केली आहे.

कल्याण येथील स्वामीनारायण हॉल येथे आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष अनिल काकडे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून *आपलं प्रतिष्ठान* ह्या नावाच्या संघटनेची स्थापना करण्यात आली. आरोग्य, शैक्षणिक, पर्यावरण, सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रिडा क्षेत्रात हि संघटना काम करणार आहे.

कोरोनाच्या संकटकाळात नागरिकांना मदत करण्यासाठी कोरोना समुपदेशन समितीची स्थापना करण्यात आली होती. कोरोना समुपदेशन समितिने दिड वर्षाच्या कालावधीत तब्बल ९ वेळा यशस्वी रक्तदान शिबिरे , मोफत शुगर टेस्ट आणि कॅल्शियम टेस्ट शिबिर, रुग्णांना प्लाझ्मा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे, बरे झालेल्या रुग्णांसाठी फिजीओथेरेपी माहिती शिबिर, कोरोना योद्धांसाठी ३ वेळा प्रशिक्षण शिबिर, अँटिजेन टेस्ट शिबिर, रुग्णांना सामान्य बेड, ऑक्सिजन बेड व ICU उपलब्ध करण्यासाठी मदत करणे , पालिकेकडून इमारतींना सॅनिटायझ करण्यासाठी मदत करणे, लसीकरण शिबिर राबवणे , रुग्णालयांची माहिती देणे, शासकीय माहिती नागरिकांपर्यंत पोहचवणे, जनजागृतीचे उपक्रम राबवणे , पालिकेला सहकार्य करणे, कोरोनाचे नियम पाळावेत म्हणून स्वाक्षरी अभियान, रुग्णांची सेवा करणारया डॉक्टर, नर्स व आशा वर्कसचा सत्कार करणे, नागरिकांच्या मनातून कोरोनाची भिती घालवण्यासाठी विविध उपक्रम, वैद्यकीय तज्ञांना बोलावून लहान मुलांची कोरोनापासून बचाव करण्यासाठी घ्यावयाची काळजी तसेच म्युकरमायकोसिस ह्या आजाराची माहिती देवून घ्यावयाची काळजी ह्यावर व्याख्यान, कोरोना काळात घरीच राहिल्याने मानसोपचार तज्ञांच्या सहकार्याने पालक- बालक समुपदेशन कार्यक्रम , रुग्णांच्या नातेवाईकांना मदत करण्यासाठी हॉस्पिटल संपर्क कार्यकर्त्यांची नेमणूक करून लवकरात लवकर मदत मिळावी म्हणून यंत्रणा उभी करणे, कोरोना योद्धांच्या व्यवसायवाढी साठी एकमेका साहाय्य करू ह्या धर्तीवर मदत करणे , कोरोना योद्धांसाठी सहल, कोरोना योद्धा महिलांसाठी हळदीकुंकू आणि विविध स्पर्धा , महिलांसाठी कर्ज शिबिर अशी अनेक कामे निःस्वार्थपणे केल्याची माहिती अनिल काकडे यांनी दिली.
कोरोनाच्या संकटकाळात नागरिकांना समितीच्या माध्यमातून मदत करण्यासाठी सर्वश्री विनायक शेणवी, भास्कर राव, सचित ताम्हणकर , जगदिश तरे, सूर्यकांत पारधे, महेश भोईर , सईद अत्तर, अजीज चौधरी, अन्सार खान, जहुर कुरेशी, विनायक भोईर, , शरद अहिरे, प्रथमेश पुण्यार्थी, योगेश धमेले, मंगेश घाटे, उमेश परब , स्वप्निल कांबळी, संदिप धोपटे, रोहन गवळे, धनंजय तायडे , संगिता मोरे, शकुंतला राय, भारती वाढे, मंगला आरोटे, वैष्णवी गावकर, तृप्ती दोडवाल, वीणा निमकर, तेजस्विनी कापडणे , नयना नायर , डिंपल दहिफुले, शिल्पा टाकळकर , करुणा कातकडे , वैशाली वाघ, सुनंदा जाधव, जयश्री सातपुते, , सरिता मोतीराळे , सीमा सुरळकर, शलाका पाटील, अल्पा राजगोर इत्यादी समितिच्या अनेक कार्यकर्त्यांनी कोरोनाची भिती न बाळगता मैदानावर काम केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close