श्री विठ्ठल प्रशालेत ध्वजारोहण समारंभ संपन्न

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर:-वेणुनगर पंढरपूर श्री विठ्ठल प्रशाला व कला, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात प्रजासत्ताकदिनानिमित्त ध्वजारोहण समारंभ स्वेरीजचे प्राचार्य डॉ बी पी रोंगे सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले प्रशालेचे प्राचार्य व्ही जी नागटिळक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत केले याप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ बी पी रोंगे सर म्हणाले की, 15 ऑगस्ट 1947 ब्रिटीशांच्या जुलमी राजवटीतून भारतमाता मुक्त झाली व या देशाला घटनेच्या माध्यमातून मतदानाचा अधिकार देऊन या देशाच्या लोकशाहीचा राजा निवडण्याचा अधिकार आपणाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला दिवस म्हणजे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन होय, म्हणून स्वातंत्र्य हे सहजासहजी मिळाले नाही त्यासाठी अनेक वीरजवानांनी प्राणांचे बलिदान दिले आसताना इतिहासात पाठीमागे वळून पाहिले असता आपल्या देशाने सर्वच क्षेत्रात अनेक आघाडीवर दैदिप्यमान प्रगती केलेली आहे आपल्या देशाचे स्वातंत्र्य आणि प्रगतिचा नावलौकीक टिकविण्यासाठी तुम्ही विदयार्थ्यांनी राष्ट्रनिष्ठा हा गुण घेण्याचे आवाहन केले.
यावेळी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. श्री अभिजीत (आबा) धनंजय पाटील विद्याथ्र्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की विद्याथ्यांनी प्राप्त परिस्थितीमध्ये अंगी आसलेल्या कला गुणांचे प्रदर्शन करून गुणवान आदर्श नागरीक बनण्याचे व या राष्ट्रनिर्माण कार्यामध्ये सहभागी होऊन ज्ञानाचा लाभ आणि भविष्याचावेध घेण्याचे सांगितल यावेळी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत (आबा) धनंजय पाटील व्हा. चेअरमन सौ. प्रेमलता रोगे तज्ञ संचालक प्रा तुकाराम मस्के कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, कारखान्याचे कार्यकारी संचालक गायकवाड डी. आर. प्राचार्य नागटिळक व्ही. जी. पर्यवेक्षक नागणे एस के शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सह कारखान्याचे अधिकारी, कामगार, शेतकरी सभासद पालक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते या कार्यक्रम प्रसंगी विद्याथ्यांनी विविध देशभक्तीपर गीते गाऊन सांस्कृतीक कार्यक्रम सादर केले विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते खाऊ वाटप करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. चव्हाण एस. बी यांनी केले तर प्रा बनसोडे एन बी. यांच्या आभाराने कार्यक्रमाची सांगता झाली.