अनेक शिधापत्रिकाधारक स्वस्त धान्यापासून दूरच-जिल्हाध्यक्षा साबेरा इंगळे
पुरोगामी संघर्ष परिषद आंदोलन उभारणार

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
–श्रीकांत कसबे
कुरुंदवाड:- महाराष्ट्र शासन एकीकडे विकासाच्या वल्गना करत असताना दुसरीकडे मात्र गोरगरिबांना दैनंदिन जीवन जगत असताना आशेचा किरण म्हणजे रेशन दुकानातून मिळणारे स्वस्त धान्य मात्र अनेक कारणे दाखवून दारिद्र्यरेषेची अट असो वा उत्पन्नाच्या मर्यादेची अट असो जास्तीत जास्त गोरगरीब लोकांना स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे धान्य कसे मिळणार नाही याचीच व्यवस्था शासनाने करून ठेवल्यामुळे अनेक शिधापत्रिका धारक स्वस्त धान्य दुकानाकडे फक्त हेलपाटे मारून मेटाकुटीस आल्याने अशा गोरगरीब कुटुंबांना स्वस्त धान्य मिळण्यासाठी पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात व्यापक लढा उभारणार असल्याची माहिती पुरोगामी संघर्ष परिषदेच्या महिला आघाडीच्या वरिष्ठ जिल्हाध्यक्षा सौ.साबेरा इंगळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.
प्रसिद्धी पत्रकात साबेरा इंगळे पुढे म्हणाल्या की, पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांचे नेतृत्वाखाली कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांना शिष्टमंडळ भेटून सदर बाब निदर्शनास आणून देऊन जिल्हाभर व्यापक लढा उभारून गोरगरिबांच्या रोजी रोटीचा प्रश्न ऐरणीवर मांडणार असल्याचेही त्या म्हणाल्या.