पुरोगामी संघर्ष परिषदेमध्ये सर्वमान्यं कार्यकर्त्यांना संधी — राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा.सुभाष वायदंडे

इस्लामपूर (ता.वाळवा)येथे पुरोगामी संघर्ष परिषदेच्या नामअनावरण प्रसंगी राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे,अमर शिंदे,वनिता सोनवले,संदीप माने व इतर.
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
–श्रीकांत कसबे
इस्लामपूर:- पुरोगामी विचाराने सामाजिक कार्यात निस्वार्थीपणे समाजाचं काम करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्यासाठी पुरोगामी संघर्ष परिषद ही सामाजिक संघटना एक हक्काचं कार्यक्षेत्र असल्याचे प्रतिपादन पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांनी केले. ते इस्लामपूर येथे संघटनेच्या नाम फलकाचे अनावरण प्रसंगी बोलत होते.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र युवक उपाध्यक्ष अमर शिंदे,सांगली जिल्हाध्यक्षा (वरिष्ठ)वनिता सोनवले, वाळवा तालुका वरिष्ठ अध्यक्ष शिवाजीराव सकटे ( मा.सरपंच बनेवाडी) वाळवा तालुका युवकचे अध्यक्ष संदीप माने, इस्लामपूर शहराध्यक्षा शैनाज जमादार, वाळवा तालुका उपाध्यक्षा रूपाली पेठकर, वाळवा तालुकाध्यक्ष लीलाताई संकपाळ, जिल्हा उपाध्यक्ष कोमल भोसले,रेखा साळुंखे इत्यादी वाळवा तालुक्यातील पुरोगामी संघर्ष परिषदेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.