Uncategorized

स्वेरी’ प्राध्यापकांच्या फार्मसी संदर्भातल्या पुस्तकाचे प्रकाशन

छायाचित्र- ‘फार्मासुटीकल ज्युरिसप्रुडन्स’ पुस्तकाचे प्रकाशन करताना स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगे सोबत प्राचार्य डॉ. मिथुन मणियार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ, प्रा. वृणाल मोरे, प्रा.स्नेहल चाकोरकर व प्रा. ज्योती मोरे.

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर- स्वेरी संचलित फार्मसी (पदवी)चे प्राचार्य डॉ. मिथुन मनियार, प्रा. स्नेहल चाकोरकर व पुणे येथील महाविद्यालयाच्या प्रा. प्रियांका चांडक यांनी एका पुस्तकाचे प्रकाशन केले असून हे पुस्तक फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
‘फार्मासुटीकल ज्युरिसप्रुडन्स’ नावाचे हे पुस्तक ‘फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया’(पीसीआय), न्यू दिल्लीच्या अभ्यासक्रमावर आधारीत आहे. यात फार्मसी संबंधित कायद्यांची संपूर्ण माहिती आहे. यामुळे हे पुस्तक अधिकाधिक विद्यार्थी वापरात आणतील. या पुस्तकातील एकूण पाच युनीट हे १६ अध्यायात विभागले आहेत. तर प्रत्येक अध्यायात फार्मसीच्या कायद्या संदर्भात सविस्तर विश्लेषण केले असून सोबत बहुपर्यायी प्रश्न, दीर्घ व लघु प्रश्न हे उत्तरासहित दिलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना हे पुस्तक भविष्यात खूप फायदेशीर ठरणार आहे. हे पुस्तक टेक्निकल पब्लिकेशन, पुणे तर्फे प्रकाशीत करण्यात आले असुन नुकतेच या पुस्तकाचे प्रकाशन स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सोबत डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ, प्रा. वृणाल मोरे, प्रा. ज्योती मोरे आदी उपस्थित होते. डॉ. रोंगे सर यांच्या प्रेरणेतून तयार झालेले हे पुस्तक एकूण २६६ पानी असून या एका पुस्तकाचे मुल्य तीनशे चाळीस रुपये इतके आहे. फार्मसीच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना व जीपीएटी या राष्ट्रीय पातळीवरील व बी. फार्मसी नंतर पुढील उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेण्याकरीता ह्या पुस्तकातील अभ्यासक्रम फायदेशीर ठरणार आहे. फार्मसीच्या विश्वात स्वेरीच्या प्राध्यापकांचे पुस्तक आल्यामुळे फार्मसीच्या विद्यार्थ्यांमध्ये आनंद पसरला आहे. पुस्तकाच्या लेखकांचे संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरी अंतर्गत असलेल्या महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी अभिनंदन केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close