
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
मोहोळ.:-रिपब्लिकन पिपल्स फ्रंट (लोकशाही राष्ट्रवादी आंदोलन)
ह्या संघटनेची महाराष्ट्र मीटिंग घेण्यात आली. या वेळी रिपब्लिकन पीपल्स फ्रंट चे राष्ट्रीय अध्यक्ष जितेंद्र कुमार हे होते.तर प्रमुख उपस्थिती राष्ट्रीय संयोजक अॅड.रावसाहेब मोहन हे होते.या महाराष्ट्र मीटिंग मध्ये रिपब्लिकन पीपल्स फ्रंटने राजकीय पार्टी स्थापन करण्यातचा निर्णय घेण्यात आला .या वेळेस अनेक कार्यकर्त्यांनी राजकीय पार्टी चे नाव सुचवण्यात आले. त्या वेळेस रिपब्लिकन पिपल्स फ्रंट चे महाराष्ट्राचे अध्यक्ष धनंजय आवारे यांनी लोकशाही राष्ट्रवादी पार्टी हे नाव सुचवले आणि ह्या नावाची राजकीय पार्टी ला सर्व महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी संमती दिली व राजकीय पार्टीची घोषणा करण्यात आली.या वेळेस अर्जुन उजगरे(मराठवाडा)अशोक नागटिळक(पश्चिम महाराष्ट्र) आनंद मोहन(ठाणे)रमेश निकाळजे(मुबई)सूर्यकांत कदम(कणकवली)सुधिर सोनवणे(रायगड)विष्णू सुरसे(अहमदनगर)हरी सरवदे,संपूर्ण महाराष्ट्र कार्यकर्त्यांनी या वेळेस लोकशाही राष्ट्रवादी पार्टी चा विजय असो अशा घोषणा देत पार्टी च्य नावास सर्व कार्यकर्त्यांनी समंती दिली.