आंबेडकरी चळवळ पुढे नेण्याची जबाबदारी आता आमची—प्रा. सुभाष वायदंडे
तासगाव शहर संघटनेच्या नामफलकाचे अनावरण प्रसंगी व्यक्त केले विचार

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
तासगांव:- पुरोगामी विचाराने चालणाऱ्या आंबेडकरी चळवळी काही जातीयवादी सत्तेच्या वळचणीला विसावल्या तर काही सत्तेच्या आपेक्षेनं पायथ्याला जाऊन ताटकळत बसल्यामुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेली पुरोगामी विचारांची चळवळ आता पुढे ताकतीने नेण्याची जबाबदारी पुरोगामी संघर्ष परिषदेवर असल्याने कार्यकर्त्यांनी आंबेडकरी जनतेशी गद्दारी न करता चळवळ ताकतीनं पुढे घेऊन गेलं पाहिजेे आणि ती चळवळ टिकवली पाहिजे असं प्रतिपादन पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांनी केले ते तासगांव येथे ज्योतिबा मंदिर शेजारी वरचे गल्ली येथील तासगाव शहर संघटनेच्या नामफलकाचे अनावरण प्रसंगी बोलत होते.
प्रा. वायदंडे पुढे बोलताना म्हणाले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संघर्ष करून ताट मानेने जगायला शिकवलं असताना सुद्धा जातीयवाद्यांशी हात मिळवणी करून बाबासाहेबांच्या विचाराशी गद्दारी करणाऱ्यांना आंबेडकरी जनता कधीच माफ करणार नाही.
सुरुवातीला प्रा. सुभाष वायदंडे यांनीभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राज्य उपाध्यक्ष राजू घाटगे, राज्य
कमिटी सदस्य प्रकाश फाळके, राज्य उपाध्यक्षा सौ. सुनीता खटावकर, पश्चिम महाराष्ट्र वरिष्ठ संघटक तात्यासाहेब देवकुळे उपस्थित होते.
यावेळी राजू घाटगे, सुनिता खटावकर, अर्जुन दादा थोरात, सूर्यकांत देवकुळे यांची भाषणे झाली.
सदर कार्यक्रमास पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष गणेश घाटगे, वरिष्ठ जिल्हाध्यक्ष सचिन कुराडे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मुसा भाई मुल्ला, जिल्हाध्यक्षा पुनम फाळके, जिल्हा उपाध्यक्ष राहुल वारे, तासगाव तालुका शहर अध्यक्ष गोपाळ थोरात, भारत मोरे ,सर्जेराव भंडारे, प्रवीण भंडारे, जनार्दन घाटगे, शिवाजी केंगार, शिवाजी घाटगे महाराज ,रवींद्र हंकारे, प्रशांत जाधव, महेक निशानदार, आनंदा हंकारे, चंदाबाई थोरात, पिंटू थोरात इत्यादी पुरोगामी संघर्ष परिषदेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
शेवटी आभार सूर्यकांत देवकुळे यांनी मानले.